नाशिक ग्रामीण

अ …ब ब ब. …साकोरा येथे एकाच रात्री सात घरफोड्या

Nandgaon news

साकोरा येथे एकाच रात्री सात घरफोड्या

वेगंवान मराठी :मारुती जगधने
दी, 15जुनं 2026

नांदगाव तालुक्यातील **साकोरा गावात शनिवारी रात्री चोरट्यांनी सात बंद घरांचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या.** घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

– चोरट्यांनी घरातील **लोखंडी पेटी उचलून शेतात नेऊन फोडली.**
– पाच वर्षांपूर्वीही याच भागात अशाच प्रकारे सहा घरफोड्या झाल्या होत्या.
– उन्हाळ्यामुळे अनेक कुटुंबे घराला कुलूप लावून बाहेर झोपली होती. याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला.
– श्रीराम मंदिर परिसरातील रोहिदास गल्लीतील **देवबा ठाकरे, विजय ठाकरे, चंद्रा ठाकरे** तसेच राजवाडा परिसरातील **व्यंकट निकम, कल्याबाई निकम, विजय निकम** आदींच्या घरांना लक्ष्य करण्यात आले.
– एका घरातील कपाट घरातून दूर शेतात नेऊन फोडण्यात आले. त्यातून सुमारे **५० हजार रुपये रोख रक्कम** आणि काही दागिने चोरीला गेल्याचे समोर आले.
– हेमंत निकम यांच्या घराच्या मागील बाजूची खिडकी काढून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो अयशस्वी ठरला.
– सकाळी घरमालक परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
– पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन **चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.**

ही घटना परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी असून, नागरिकांनी घरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!