नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

चांदवड नांदगाव मनमाड तालुक्यात अपघातांची मालिका; विविध दुर्घटनांत सहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Nandgaon News

चांदवड नांदगाव मनमाड तालुक्यात अपघातांची मालिका; विविध दुर्घटनांत सहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी
वेगवान मराठी : मारुती जगधने 13 जुलै 2026
चांदवड, प्रतिनिधी : रविवारी चांदवड तालुका आणि परिसरात अपघातांची मालिका सुरू राहिल्याने हळहळ व्यक्त होत आहे. इंदूर–पुणे महामार्गावरील दोन गंभीर अपघातांसह अन्य एका दुर्घटनेत मिळून सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
पहिल्या भीषण अपघातात मनमाडजवळील अंकाई शिवारात कंटेनर आणि कार यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती गंगापूर (जि. नाशिक) येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस, महामार्ग सुरक्षा पथक आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
दरम्यान, इंदूर–पुणे महामार्गावरील चोंडी घाट परिसरात आणखी एक कंटेनर अपघातग्रस्त झाला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याच दिवशी चांदवड परिसरात आणखी एका अपघातात तवेरा वाहन आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
एकाच दिवशी घडलेल्या या सलग अपघातांमुळे चांदवड तालुका आणि परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सर्व घटनांची चौकशी सुरू असून अपघातांची नेमकी कारणे शोधली जात आहेत. वाहनचालकांनी महामार्गावर वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!