महिन्याभरापूर्वीच्या वादातून तरुणाची हत्या; मृतदेह पोत्यात भरून घाटात फेकला
NANDGAON NEWS
महिन्याभरापूर्वीच्या वादातून तरुणाची हत्या; मृतदेह पोत्यात भरून घाटात फेकला
वेगवान मराठी : मारुती जगधने
दि 25 एप्रील 2026
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील २३ वर्षीय तरुणाची जुन्या वादातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात बांधून परधडी घाटात फेकून दिला होता.
घटनेचा संक्षिप्त तपशील
मयत: रेवननाथ देविदास पवार (वय २३ वर्षे), रा. जातेगाव, ता. नांदगाव.
संशयीत आरोपी: दादा सुरुपचंद निकम, रा. लोढरा, ता. नांदगाव.
फिर्यादी: अरुण देविदास पवार (मयताचा भाऊ).
घटनास्थळ: परधडी घाटातील म्हसोबा मंदिरासमोर, ता. नांदगाव.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत रेवननाथ पवार आणि आरोपी दादा निकम यांच्यात महिनाभरापूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते. याच वादाचा राग मनात धरून, आरोपीने २० एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ च्या दरम्यान रेवननाथ यास कोणत्यातरी हत्याराने बेदम मारहाण करत जिवे ठार मारले.
हत्या केल्यानंतर आरोपीने रेवननाथचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि तो नादगांव तालुक्यातील परधडी घाटातील म्हसोबा मंदिराच्या परिसरातील शिवारात फेकून दिला. २५ एप्रिल रोजी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस कारवाई
या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (Atrocities Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील संशयीत आरोपीस काही तासात अटक करण्यात पोलीसांना यश आले .
गुन्हा दाखल वेळ: दि. २५/०४/२०२६ रोजी सायंकाळी १९:३७ वा.
तपास अधिकारी: मनमाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी . दर्शन दुगड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



