पाच दिवसांमध्ये दुचाकी स्वार भामट्यांनी दोनदा डाव भरला ‘ व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण ‘ चोर सक्रिय
वेगवान मराठी : मारुती जगधने
दिनांक 23 फेब्रुवारी 2026
16 फेब्रुवारी रोजी पेंढारकर बाबांचे 27 ग्रॅम सोन्याची अंगठी दुचाकी स्वरांनी जबरीने पळवली ही घटना ताजी असताना या घटनेचा अजून शोधायला लागला नाही त्यातच त्यानंतर अवघ्या पाच दिवसाने दि 21 फेब्रुवारी रोजी दुपारी व्यापाऱ्याच्या दुचाकी मधून तब्बल पाच लाख रुपये दुचाकी स्वरांनीच चोरले याचा अर्थ दुचाकी स्वार भामटे सराईत गुन्हेगार दिसून येतात . या गुन्हेगारांना आता चाप बसणं अत्यंत गरजेचे झाले आहे .या घटनेमुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले . दोन्ही घटना व्यापाऱ्यांच्या संबंधित घडल्या आहेत पहिल्या घटनेमध्ये पेंढारकर बाबा हे कांदा व्यापाऱ्याचे पालक आहेत तर दुसऱ्या घटनेतील देखील व्यापारीच आहे . यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले .कांदा मका कडधान्य इत्यादी मालाचे लिलावा नंतर दैनंदिन पैसे बँकेतून घेऊन व्यापारी शेतकऱ्यांना पैसे वाटप करतात या घटनेचा दुचाकीस्वार भामट्यांनी रे की केली असावी या दोन घटनांचा शोध लावणे हे पोलिसांना आता आव्हान ठरले आहे .कारण की दोन्ही घटनांमध्ये दु चाकी स्वरांनीच चोरी केलेले आहे .
नांदगावमध्ये धान्य शेड परिसरात अवघ्या पाच मिनिटांत ५ लाख रुपयांची चोरी होणे ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही, तर आपल्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवणारी बाब आहे. भरदिवसा, वर्दळीच्या ठिकाणी आणि अत्यंत कमी वेळेत इतकी मोठी रक्कम गायब होणे ही गंभीर बाब मानली पाहिजे.
या प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरुद्ध नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असला, तरी प्रश्न केवळ तपासापुरता मर्यादित राहत नाही. अशा घटना सूचित करतात की गुन्हेगारांकडे अचूक माहिती, वेळेचे नियोजन आणि पळवाटांची आखणी आधीपासूनच असते. बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर काही अंतरावरच चोरी होणे हे ‘पाठलाग टोळी’ सक्रिय असल्याचा इशारा देणारे आहे.
नागरिकांची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची
मोठी रक्कम काढल्यानंतर ती वाहनाच्या डिकीत ठेवून वर्दळीच्या ठिकाणी नजरेआड जाणे धोकादायक ठरू शकते. अशा वेळी—
शक्य असल्यास रक्कम थेट सुरक्षित ठिकाणी जमा करावी.
एकट्याने मोठी रक्कम न नेता विश्वासू व्यक्तीची साथ घ्यावी.
वाहनात पैसे ठेवणे टाळावे.
बँक परिसरात किंवा मार्गावर संशयास्पद हालचालींकडे लक्ष द्यावे.
सावधगिरी हीच सर्वोत्तम सुरक्षा आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते.
पोलिस आणि बाजार समितीची भूमिकाही निर्णायक
धान्य शेडसारख्या व्यापारी केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत व सक्षम असणे अत्यावश्यक आहे. फुटेजची नियमित तपासणी, गस्त वाढविणे आणि बँक परिसरात विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पोलिसांनी तातडीने तपास पूर्ण करून गुन्हेगारांना जेरबंद करणे गरजेचे आहे; अन्यथा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल.
पाच मिनिटांत पाच लाखांची चोरी ही योगायोग नसून, ती नियोजनबद्ध गुन्ह्याची शक्यता दर्शवते. कायदा-सुव्यवस्था यंत्रणेने दक्षता वाढवणे आणि नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे, या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. अन्यथा, अशा घटना पुन्हा घडण्याची भीती नाकारता येत नाही.
दुसऱ्या घटनेमध्ये दिनांक 16 फेब्रुवारी रोजी