नाशिक – पुणे रेल्वे मार्गासाठी सिन्नर तालुक्यातून दोन वेगवेगळे मतप्रवाह… ! तालुक्यातील विकास महत्त्वाचा का अंतर.. ?
वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर. दि : 23 जानेवारी 2026 — सिन्नरच्या विकासासाठी नाशिक – पुणे रेल्वे मार्ग सिन्नर तालुक्यातून वावी – शिर्डी मार्गे गेल्यास दुहेरी फायदा होईल व रोजगार उपलब्ध होऊन व्यवसायाला चालना मिळेल व सिन्नरच्या विकासात आपोआपच भर पडेल. ही गोष्ट शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक पवित्र घेतला असून आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यात आली आहे. त्यामुळे जनशक्ती पक्ष सिन्नर यांच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. त्यामध्ये इंडियाबुल्स रेल्वे लाईन मार्ग चालू करून सदर मार्ग हा शिर्डी येथे सलग्न करावा. अशी मागणी ही करण्यात आली आहे.
कारण तांत्रिक अडचणीमुळे मुंबई नारायणगाव पुणे मार्ग रद्द झाल्यामुळे नवीन मार्ग प्रस्तावित असल्यामुळे हाच मार्ग पुढे नेण्यात यावा .त्यामुळे तालुक्यातील पूर्व भाग हा पूर्ण दुष्काळी भाग असल्यामुळे त्यात गावांचा मोठ्या प्रमाणात विकास घडवून येईल व रोजगार उपलब्ध होईल .
इंडियाबुल्स हा प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित होता परंतु राज्य शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यामाने सदर प्रकल्प हा हस्तांतरित करण्याचे निश्चित झाल्याने आता इंडियाबुलचा वनवास संपला आहे. त्यामुळे इंडियाबुल्समधील रोजगार आला चालना मिळेल व या प्रकल्पासाठी कोळसा वाहतूक करण्यासाठी रेल्वेची आवश्यकता असल्याने नाशिक हा रेल्वे मार्ग सिन्नर मधून इंडियाबुल्स कंपनी साठी या रेल्वेचा दुहेरी उपयोग लक्षात घेऊन शासनाने हा रेल्वे मार्ग सिन्नरच्या विकासासाठी शिर्डी मार्गेच योग्य असल्याचा पवित्र प्रहार जनशक्त पक्षाने घेतल्याने सिन्नर तालुक्यात आता दोन राजकीय मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे .
तालुक्यातून राजकीय पक्षांचे दोन मतप्रवाह …
एकीकडे सिन्नरचे भूमिपुत्र व जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांची वेगळी भूमिका या रेल्वे मार्गावर दिसून येत आहे. श्री वाजे यांच्या मागणीनुसार सदर मार्ग हा शून्यसंगण नारायणगाव मार्गेच योग्य असल्याचा व प्रवाशांचा पैसा व वेळ वाचणार असल्याने हाच मार्ग योग्य असल्याची थांब भूमिका राजाभाऊ वाजे यांनी वारंवार मांडून शासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार केल्या आहे. तर दुसरीकडे मात्र वेळेचा व आमचा विचार न करता चिन्हाचा विकासाचा विचार व्हावा व सिन्नरच्या विकासात या रेल्वे मार्ग मार्गामुळे भर पडेल अशा अपेक्षांनी ही जनता या रेल्वे मार्गाकडे पहात असल्याने हा मार्ग शून्य इंडियाबुल्स मार्गे व्हावी शिर्डी मार्गेच व्हावा अशी ठाम भूमिका प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दातात व संदीप आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आज सिन्नर तहसील कार्यालयात येथे लाक्षणिक धरण आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. व या मागणीसाठी शासनाच्या ही गोष्ट लक्षात आणून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष तीव्र आंदोलन उभे करणारा असल्याची माहिती श्री दातार यांनी पत्रकार यांच्याशी बोलताना व्यक्त केली आहे.
इंडियाबुल्स ही कंपनी चालू करण्यात यावी व त्यामध्ये स्थानिक युवकांना रोजगार मिळावा व त्यांना प्राधान्य देण्यात यावे कुंभमेळ्या निमित्त स्थानिक रोजगारांना जे रोजगार उपलब्ध होतील त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष कैलास दातीर व शहराध्यक्ष संगीता आगळे यांनी केली आहे तालुकाध्यक्ष कैलास दातीर शहराध्यक्ष संगीता आगळे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष चंद्रकांत डावरे युवा तालुकाध्यक्ष पांडुरग आगळे. भास्कर दराडे. गणेश थोरात .खंडू सांगळे. ज्ञानेश्वर लोखंडे .विलास भाटजिरे .योगेश कहाडळ .अशोक मुतडक .खंडू बिन्नर .प्रकाश थोरात. सोमनाथ डावरे. आदी पदाधिकारी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर स्वाक्षरी केले आहे.



