नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

श्रीकृष्णाने जन्मदात्या विठ्ठलाचा खून केला !

Nandgaon news

श्रीकृष्णने जन्मदात्या विठ्ठलाचा  खून केला

वेगवान मराठी : मारुती जगधने
दिः 5 जानेवारी 2025
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीकृष्ण (उर्फ सावता) विठ्ठल गायकवाड (वय २०) या युवकाने आपल्या वडिलांचा, विठ्ठल तुकाराम गायकवाड (वय ५८), यांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नांदगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेबाबत  मयताचे चुलत भाऊ जगन्नाथ नामदेव गायकवाड (वय ५५) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, दि. ०४ जानेवारी २०२६ रोजी रात्री साधारण ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संशयीत आरोपीने वडील झोपेत असताना लोखंडी पाईपने मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. संशयीत
आरोपीने पोलिसांकडे दिलेल्या कबुलीनुसार, मृत विठ्ठल गायकवाड यांना दारूचे व्यसन होते आणि घरात वारंवार वाद व त्रास होत असे. तसेच मयत विठ्ठल यांनी घरामध्ये विजेचे करंट सोडून जीविताला धोका निर्माण केला होता असे  संशयित आरोपीने पोलीस कबुलीत दिले . याच पार्श्वभूमीवर, भीती व रागातून ही घटना घडल्याचे आरोपीचे म्हणणे आहे. यापूर्वी शेतात वडिलांकडून  जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोपही आरोपीने केला आहे.
या प्रकरणी नांदगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे जातेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कौटुंबिक वादातून टोकाचा निर्णय घेतला गेल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!