पाझर तलावामुळे शेतजमिनी पाण्याखाली; घराची पडझड, जनावरे दगावली, विषारी सापांची कोरड्या जागे कडे धाव….
पाझर तलावामुळे शेतजमिनी पाण्याखाली; घराची पडझड, जनावरे दगावली, विषारी सापांची कोरड्या जागे कडे धाव....

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला दिनांक : 29 सप्टेंबर 2025
येवला तालुक्यातील वाघाळा परिसरात अतिवृष्टी व पाझर तलावाच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे बुडीत क्षेत्रात नसतानाही अनेक शेतजमिनी आणि घरे पाण्याखाली गेली आहेत. या गंभीर परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना जनता दरबारासाठी निवेदन दिले व मदतीची मागणी केली..
मे महिन्यापासून आजपर्यंत सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे वाघाळे सध्या ६७ एकरांपेक्षा जास्त क्षेत्र पाण्याखाली गेले असून, शेतकऱ्यांची घरे चारही बाजूंनी पाण्याने वेढली गेली आहेत. कोंडीराम मारुती सोमासे यांच्या घराच्या भिंती कोसळल्याने वृद्ध व लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
भास्कर चंद्रभान सोमासे यांची दुभती म्हैस दगावली असल्याने 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे…
**********
या शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी…
**************
शेतकरी व गट नंबर :
निवृत्ती त्र्यंबक नवरे (गट नं. 7), बाजीराव लहानू सोमासे (गट नं. 83/3 व 3), भास्कर चंद्रभान सोमासे (गट नं. 77/2), रावसाहेब किसन काकडे (गट नं. 94), गोरख नारायण सोमासे (गट नं. 96), अशोक विठ्ठल सोमासे (गट नं. 98), रंगनाथ यशवंत सोमासे (गट नं. 97), रघुनाथ शंकर सोमासे (गट नं. 104), रवींद्र विश्वनाथ सोमासे (गट नं. 96/1) हे शेतकरी सर्वाधिक बाधित झाले आहेत.
**************
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
***************
1. बुडीत क्षेत्रात नसलेल्या जमिनी पाण्याखाली जाणार नाहीत यासाठी तातडीची दुरुस्ती करावी.
2. पाझर तलाव मूळ प्रकल्प अहवालानुसार पुनर्बांधणी करावी.
3. चुकीच्या ठिकाणी झालेला तलाव बांधकामाचा निर्लेखन करून आवश्यक ती सुधारणा करावी.
4. बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना 100% नुकसानभरपाई द्यावी.
5. अशा आपत्तीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन व लेखापरीक्षण करावे.
**************
येवला विधानसभा क्षेत्रातील सर्व साठवण तलाव पाझर तलाव, सिमेंट नाला नाला बांध यांच्या बांधणीचे तांत्रिक परीक्षण झाले पाहिजे. पाण्याची गरज, उपयुक्तता यांचा विचार करुन डागडुजी, दुरुस्ती व आवश्यक असल्यास संपूर्ण पूनर्बंधणी करावी..
– भागवतराव सोनवणे,
संयोजक जल हक्क संघर्ष समिती, येवला
*************



