नाशिक ग्रामीण

रुई ता.निफाड येथे रस्ताप्रश्नी सुरू असलेले आमरण उपोषण समाप्त ; डॉ.श्रीकांत आवारे यांची मध्यस्थी, माजी जिल्हा परिषद सदस्या अमृताताई पवार यांचीही उपस्थिती

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दिनांक २१ नोव्हेंबर :- जुना खेडलेझुंगे ते रुई रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने दुरुस्तीसाठी रुई येथील ग्रामस्थ उपोषणास बसले होते. उपोषणार्थी ग्रामस्थांची तब्बल तीनदा भेट घेऊन डॉ.श्रीकांत आवारे यांच्या प्रयत्नातून अखेर या रस्त्याचे काम सुरू झाल्याने उपोषणकर्त्यांनी आज दिनांक २१ रोजी तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले.
जुना खेडलेझुंगे रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्ता कामास तातडीने मंजुरी मिळून काम सुरू व्हावे या मागणीसाठी रुई ता.निफाड येथील ग्रामस्थ उपोषणास बसले होते. दोन दिवसात ठोस निर्णय न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता.
रस्त्याच्या प्रश्नाबाबत वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, तहसिलदार, आमदार यांना पत्र व्यवहार तसेच लेखी निवेदन देऊनही अनेक वर्षापासून ही मागणी प्रलंबित असुन न्याय मिळत नाही, म्हणून दि.१९ नोव्हेंबर पासून रूई धानोरे ग्रामपंचायत कार्यालयासमोर रामदास तासकर यांचे नेतृत्वाखाली अंकुश तासकर, विलास गायकवाड, बापू रोटे, निलेश रोटे, बापू तासकर, लीलाबाई बोरगुडे, संतोष तासकर, शोभा रोटे, संदीप रोटे, सुनील तासकर, बाळासाहेब गायकवाड, वैभव तासकर, लखन तासकर, महेश झुरळे, योगेश रोटे, बापू गायकवाड, राजू बोरगुडे, पिराजी तासकर, सुनिल शिंदे, केदारनाथ तासकर, माधव रोटे, पुंजाराम तासकर, दत्तात्रय कणसे, संजय तासकर, शरद तुपे,ओम बोरगुडे, किरण तासकर, भाऊसाहेब तासकर, भागवत वाघ, चंद्रभान तुपे आदींसह आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणस्थळी पंचायत समिती शाखा अभियंता सुभाष अहिरे, मंडळ अधिकारी जयंत लिलके, डॉ.श्रीकांत आवारे, अशोकराव नागरे, पांडुरंग राऊत, प्रसाद घोटेकर यांनी भेट दिली. याप्रसंगी ग्रामस्थांच्या विनंतीवरून ना.छगन भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या पत्रावर या रस्त्याचे तातडीने ठेकेदार विशाल नागरे यांनी या रस्त्याचे काम तातडीने सुरू केले. त्यामुळे उपोषणकर्त्यांचे समाधान होऊन त्यांनी डॉ.श्रीकांत आवारे यांचे मध्यस्थीने उपोषण सोडले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या अमृताताई पवार यांनीही उपस्थित राहून उपोषण सोडले व या रस्त्याचे शासकीय मंजुरीने काम होत नसेल तर आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!