नाशिक ग्रामीण

खेडलेझुंगे रस्त्यावर अपघात नसून हत्याच ; दोघांच्या हत्येचे हे मोठे कारण आले समोर…

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.२ नोव्हे :- दि.१ नोव्हे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खेडले ते ब्राम्हणवाडे रस्त्यावरील गोदावरी नदीच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात पती – पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहा व्हिडीओ स्टोरी

याबाबत फिर्यादी विश्वनाथ एकनाथ दराडे, वय २९, व्यवसाय वकील, रा.खंबाळे ता. सिन्नर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.१ नोव्हें रोजी दुपारी जमिनीच्या वाटपाच्या कारणावरून फिर्यादीचे मयत मोठे भाऊ व वहीणी यांच्यासोबत आरोपी भाऊसाहेब साबळे याचा वाद झाला होता.

त्यानंतर आरोपीने आपल्या ताब्यातील इको चारचाकी क्र.एम.एच.१५ जे.एस.१९५४ द्वारे फिर्यादीच्या भावाच्या क्र.एम.एच.१५ बी वाय ५७२५ या मोटारसायकलचा डोंगरगावपासून पाठलाग करत खेडलेझुंगे ते ब्राम्हणवाडे रस्त्यावरील गोदावरी नदीच्या पुलावर जाणीवपूर्वक जोरदार धडक दिली.

या धडकेत पती – पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी भाऊसाहेब सखाहरी साबळे, रा. डोंगरगाव, ता.निफाड याच्याविरुद्ध भा.न्या.सं.२०२३ चे कलम १०३(१), ३५२, ३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि ढोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!