महाराष्ट्र,देश

सह्याद्रीच्या खोऱ्यातील मराठी वाघाने बिबट्याला ठार केले .

Nandgaon News

 

  • सह्याद्रीच्या खोऱ्यातील मराठी वाघाने बिबट्याला ठार केले .

वेगवान मराठी : मारुती जगधने ॥

दि . 30 सप्टेबर 2025 ॥

चिपळूण तालुक्यातील तोंडली-वारेली सीमेजवळ भीषण बिबट्याचा हल्ला

चिपळूण तालुक्यातील तोंडली-वारेली सीमेवर मध्यरात्री भीषण घटना घडली. घरात घुसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात आशिष शरद महाजन गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर डेरवण येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आशिष महाजन यांनी प्राणपणाने झुंज देत बिबट्याला ठार मारण्यात यश मिळवले. एकट्याने दिलेली ही झुंज अत्यंत शौर्यपूर्ण मानली जात आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

ही घटना जितकी भयावह आहे तितकीच धाडसाची सुद्धा आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात अजूनही संकटसमयी झुंज देणारे धाडसी व्यक्तिमत्व जिवंत असल्याचे यावरून अधोरेखित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!