शेती

निफाड तालुक्यात अतिवृष्टीने २६ हजार ८२७ हेक्टर क्षेत्र बाधित निफाडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांचेकडून पाहणी

 

In Niphad taluka, 26,827 hectares of land have been affected due to heavy rainfall.

निफाड तालुक्यात अतिवृष्टीने २६ हजार ८२७ हेक्टर क्षेत्र बाधित

निफाडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांचेकडून पाहणी

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद :- निफाड तालुक्यात दि.२७ सप्टें रोजी रात्री सलग पडलेल्या पावसाने निफाड तालुक्यात प्राथमिक अंदाजानुसार ३० हजार १८० शेतकऱ्यांचे सुमारे २६ हजार ८२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती निफाडचे तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी दिली.
दि.२७ सप्टें रोजी संध्या ७ वाजता सुरु झालेल्या पावसाने निफाड तालुक्यात कहर केला. यात ऊस, मका, सोयाबीन, कांदा, कांदा रोप, द्राक्षे, डाळिंब, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तसेच वाहून गेल्याने जमिनीची सुपीक मातीही वाहून गेली आहे.

◆ सरसकट पंचनाम्यांची मागणी
तालुक्यात सरासरी ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद अवघ्या एका दिवसात झाली आहे. यापूर्वदिखील सतत पाऊस बरसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या द्राक्षबाग मशागतीचा हंगाम सुरू आहे. मात्र, बागेत पाणी साचले आहे. मका, सोयाबीनला मोड आले आहे. त्यामुळे सर्व निकष बाजूला ठेवत पिकांचे सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

◆ निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी थेट बांधावर जात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करीत सरकार तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. गोंदेगावसह पूरस्थिती पाहणी त्यांनी केली. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!