परतीचा पाऊस लांबणीवर ,,, पुढील चार दिवस मुसळधार ते अतिवृष्टिचा इशारा — !
वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस काही दिवस सुरू च राहणार...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
नाशिक / सिन्नर : दि, 26 सेप्टेंबर — संध्या संपुर्ण महाराष्ट्र सह विदर्भ, मराठवाड़ा तसेच धाराशिव, हिंगोली,या भागात पावसाने थैमान घातले असुन प्रचंड नुकसान झाले आहे, त्यातच परतिच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने पुढील चार दिवस उत्तर महाराष्ट्र व कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे नाशिक.अहिल्यानगर , धुळे जिल्ह्यातील गावांना याचा फटका बसणार असल्याचा इशारा तज्ञ व अनुभवी हवामान अभ्यासक यांनी दिला आहे.
@ जवळपास राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एन.डी.आर.एफ.निधीतुन भरीव मदत देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे माणणी केली आहे… @
” तर महाराष्ट्रांतील शेतकऱ्यांसाठी पी.एम.केअर फंड वापरा व चहुबाजूंनी हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी त्वरित निर्णय घेतला जावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे… “
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरूच राहणार असल्याचे संकेत हवामान अभ्यासक डॉ पंजाब डक यांनी दिले आहे.. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहेत… हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे… हताश झालेला शेतकऱ्यांच्या हितासाठी पंचनामे करण्याची वाट न पाहता सरसकट सर्वच शेतकरयांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्षांनी केली आहे.
: ,,, @. या सर्व पार्श्वभूमीवर कृषी सहायक अधिकारी व कर्मचारी यांच्या एक महिण्याचा पगार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणयाचा एकमुखी निर्णय घेतला असून तसा ठराव मंजूर करण्यात आला आहे.. @



