नांदगांव तालुक्यातील एका वस्तीवर धाडसी चोरी !
(दि. १७ सप्टेंबर २०२५)
नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील केकान वस्तीवर चोरट्यांनी धाडसी चोरी केली. दिनांक १७ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मागील दरवाजातून घरात प्रवेश करून जेष्ठ नागरिक महिलेच्या अंगावरील दागिने ओरबडले. अचानक झालेल्या या हल्ल्यात आजीबाईंना कानाला किरकोळ दुखापत झाली.
घटनेदरम्यान आजीबाईंनी आरडाओरडा केल्याने चोरटे घाबरून पसार झाले; परंतु तरीदेखील त्यांनी सुमारे दोन तोळे सोने व अंदाजे 35 ह . रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीदरम्यान चोरटे आधी ठाकर वस्तीवर दिसून आले होते, मात्र नागरिक सतर्क असल्याची चाहूल लागल्याने तेथून पुढे सरकून त्यांनी केकान वस्ती गाठली व ही घटना घडवून आणली.
या प्रकरणात अनिल केकान व भाऊसाहेब केकान यांच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमध्ये पोलिसांच्या पंचनामा मध्ये एक लाख वीस हजार रुपये चोरी झाल्याचे नमूद करण्यात आले असून आजी हिराबाई यांच्या गळ्यातील व कानातील दागिने चोरांनी ओरबाडले त्यानंतर घरातील सुटकेस आणि लोखंडी पेटी घेऊन ते बाहेर पडले आणि त्यातील मौल्यवान ऐवज काढून घेतला आणि वस्तू फेकून दिल्या .
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान चोरीच्या घटनेतील चोर जळगाव बुद्रुक शिवारातील बेलेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही मध्ये चार चोर नजरेत आलेले आहे .



