नाशिक ग्रामीण

मुंबई आग्रा महामार्गावरील या घाटात अपघाताचे सत्र सुरूच

वाहनचालक गंभीर जखमी

मुंबई आग्रा महामार्गावरील या घाटात अपघाताचे सत्र सुरूच; वाहनचालक गंभीर जखमी

मनोज वैद्य/दहिवड

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहुड घाटाच्या पायथ्याला अपघाताचे सत्र सुरूच असून रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने मोठा ट्रेलर व त्यावरील अवजड मशिनरी रस्त्यावरील रोड दुभाजक भिंतीला धडकल्याने मोठा अपघात घडला त्यात वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे.


सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ च्या नाशिककडून मालेगावच्या दिशेने जात असलेला ट्रेलर क्रमांक RJ.06 GB.5650 ब्रेक फेल झाल्याने मारुती मंदिरासमोरील वळणावर सिमेंटच्या भिंतीला जोरदार धडकला.


धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की भिंतीचा चक्काचूर झाला. ट्रेलरवर बसवलेली मोठी चेन मशीनही रस्त्यावर आडवी पडली. त्यात चालक गंभीर जखमी आहे, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

अपघात होताच सोमा कंपनीचे कर्मचारी, व चांदवड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. चालकाला तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असल्याने गणाजी पवार यांच्या बजरंग रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारकांचे व लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. तासन्तास वाहतूक खोळंबा झल्याने प्रवाशांकडून प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात आला. मालेगाव कडून येणारी वाहतूक दहिवडमार्गे वळवावी लागल्याने वाहनधारकांना व प्रवाशांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला.

मनोज वैद्य

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील २१ वर्षांपासून कार्यरत असून प्रारंभी देशदुत, नंतर युवा सकाळ, पुण्यनगरी, लोकमत या नामवंत दैनिकातून परिसरातील सामाजिक, राजकीय, शेतीविषयक तसेच युवा वर्गांला मार्गदर्शक ठरेल असे लिखाण, नंतरच्या काळात ऑनलाईन बातमीदारीत पब्लिक ॲप दिल्ली, वेगवान न्यूज चॅनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!