नाशिक ग्रामीण

शेतकरी पुत्राचा सामाजिक बांधिलकी जपणारा त्रिवेणी संगम सोहळा उत्साहात

शेतकरी पुत्राचा सामाजिक बांधिलकी जपणारा त्रिवेणी संगम सोहळा उत्साहात

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव

येवला / दिनांक :1सप्टेंबर:
डॉ. श्री. बाबासाहेब खैरनार यांच्या स्माईल केअर डेंटल क्लिनिकला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन दिमाखदार पद्धतीने करण्यात आले. एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुलाने डॉक्टरीचे शिक्षण घेऊन ग्रामीण भागातच सेवा करण्याचा संकल्प केला आणि तो गेली २५ वर्षे अविरतपणे पाळला आहे, ही बाब सर्वांसाठी अभिमानाची ठरली.

या सोहळ्यात डॉ. खैरनार यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे “शेतकऱ्याचा आसूड” हे पुस्तक मान्यवरांना भेट देत सामाजिक बांधिलकी जपली. हार-तुरे न घालता शेतकऱ्यांच्या समस्यांना अधोरेखित करणारा हा उपक्रम उपस्थितांना भावला.

कालचा दिवस खैरनार परिवारासाठी ऐतिहासिक ठरला. कारण या दिवशी एकाच वेळी तीन महत्त्वाचे टप्पे गाठण्यात आले.

1. स्माईल केअर डेंटल क्लिनिकची २५ वर्षे पूर्ण.

2. सामाजिक कार्याशी निगडित बँकेची ५ वर्षे पूर्ण.

3. कन्या श्रुती खैरनार यांचे शोध फोरेन्सिक लॅब या नव्या उद्योग क्षेत्रात पदार्पण.

 

या तीन पर्वांचा संगम म्हणजेच त्रिवेणी संगम सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला.

कार्यक्रमाला येवला पोलीस स्टेशनचे PI मंडलिक साहेब, PSI भावरी साहेब तसेच येवला भूषण व IPS अधिकारी मोहिते मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या आगमनाने सोहळ्याला विशेष बहार प्राप्त झाली.

गावातील मान्यवर नागरिक, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, नातेवाईक तसेच सर्व गुरुजन यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. सूत्रसंचालन श्रुती खैरनार यांनी अप्रतिमपणे करून सर्वांची मने जिंकली, तर चिरंजीव श्रेयस खैरनार यांनी दिलेली साथ कौतुकास्पद ठरली.

संपूर्ण खैरनार परिवाराचा हा सामाजिक जाणिवेचा त्रिवेणी संगम गावासाठी अभिमानास्पद ठरला.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!