नाशिक ग्रामीण

25 प्रवासी घेऊन जाणारी लक्झरी बस पलटी . एकाच मार्गावर सलग तीन अपघात

Nandgaon news

  • 25 प्रवाशी घेऊन जाणारी लक्झरी बस पलटी . एकाच मार्गावर सलग तीन अपघात

 

वेगवान मराठी : मारुती जगधने

[दिः 14 सप्टेंबर 2025 ]

नांदगाव (ता. नांदगाव):
मालेगाव-नांदगाव रोडवर नाग्या- साग्या कॉलनी परिसरात सायंकाळ च्या दरम्यान एक भीषण अपघात घडला. प्रवाशी लक्झरी बस ही प्रवासी गाडी अचानक पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.या लक्झरी बस मध्ये सुमारे 25 प्रवासीअसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला . या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून बाकीचे किरकोळ जखमी झाले . जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार साठी दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बाहेरगावी हाल वण्यात आले . सदरची बस लग्नकार्या निमित्त प्रवास करीत होती ती नांदगाव हुन मालेगाव कडे जात होती .
अचानक पलटी झालेल्या गाडीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बाहेर गावी हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.? दरम्यान, नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे व वातावरणात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदरचे प्रवासी लक्झरी बस नांदगाव ते मालेगाव दिशेने मार्गक्रम करत होती . दुसरी घटणा
मॅजिक कारचा देखील हिंगणवाडी जवळ मालेगाव नांदगाव रोडव अपघात झाला .
दुसऱ्या अपघातामध्ये एक मुलगी जखमी झालेली आहे तर याच ठिकाणी तिसरा अपघात झाला असून यात एक कार रस्त्यापासून कडेच्या बाजूला घसरली आहे . आज नांदगाव ते नाग्या साक्या कॉलनी दरम्यान दुपारनंतर लहान मोठे सलग तीन अपघात झाले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!