
परधाडी शाळेस कुलुप ठोकले
वेगवान मराठी : मुक्ताराम बागुल
दि 29 ऑगस्ट 2025
नांदगाव ! तालुक्यातील परधाडी येथील सर्व पालक वर्ग व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळेस ग्रुप ठोकण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून कमी असलेले शिक्षक मिळावे यासाठी सतत पाठपुरावा करीत असताना देखील अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष व त्यामुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान यास कंटाळून गेल्या चार दिवसांपूर्वी लेखी अस्वासन देऊन देखील येथे 28 तारखेपर्यंत शिक्षक न दिल्यास शाळेला खूप लावू असा इशारा नांदगाव पंचायत समिती प्रशासनास देण्यात आला होता .
ते देखील कोणतीही दखल न घेतल्याने अखेर 28 ऑगस्ट 2025 रोजी गुरुवारी सकाळी 11 वाजता सर्व ग्रामस्थांनी व पालकांनी एकत्र येऊन शाळेत कुलुप ठोकले. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर बसावे लागले तर शिक्षकांनाही त्यांचे कर्तव्य शाळेच्या बाहेर वर्ग बसून शिकवतांना दिसून आले.
कुलूप लावताच शिक्षक व ग्रामस्थ यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता अनेक वेळा तर फोन न घेणे असाच प्रकार चालू राहिल्याने अखेर संतप्त नागरिक ग्रुप लावून निघून गेले. दुपारपर्यंत तरी कोणताही अधिकारी घटनास्थळी आलेला दिसून आलेला नव्हता .
यापुढे प्रशासनाकडून काय निर्णय घेण्यात येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर ग्रामस्थांशी चर्चा केली असता जोपर्यंत आमच्या शाळेस कमी असलेले शिक्षक पुरविण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही कुलुप उघडणार नाही असा पवित्र पालकांनी घेतलेला होता.



