नाशिक ग्रामीण

या ठिकाणी ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले..

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद, ता.२९ ऑगस्ट :-
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक युनिटच्या पथकाने आज दुपारी चेहडी बुद्रुक येथील ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

गौरव शंकर दवंगे (वय ३१, ग्राम महसूल अधिकारी, वर्ग-३, चेहडी बुद्रुक) असे अटकेत आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या बहिणीच्या मालकीच्या चेहडी बुद्रुक येथील सर्वे नंबर ४/ह/प्लॉट/११, क्षेत्रफळ ११९.५३ चौ.मी. या प्लॉटची बक्षीस पत्रकाची नोंद सातबारा उताऱ्यावर करून देण्यासाठी दवंगे यांनी १,००० रुपयांची लाच मागितली होती.

त्यानुसार पडताळणी करून आज (२८ ऑगस्ट) दुपारी दोन वाजेच्या सुमारास तक्रारदार लाच रक्कम देण्यासाठी गेले असता, दवंगे यांनी आपल्या कार्यालयातच तक्रारदाराकडून १,००० रुपये स्वीकारताच लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

सदर प्रकरणी आरोपी अधिकाऱ्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट मार्गाने आर्थिक लाभ घेतल्याचे उघड झाले असून त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी व पोलीस नाईक विलास निकम यांचा समावेश होता. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांनी मार्गदर्शन केले.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!