नाशिक ग्रामीण

नांदगांव माणिकपुं धरण ओव्हर फ्लो

Nandgaon News

माणिकपुंज धरण पूर्ण क्षमतेने भरले

वेगवान मराठी : दि . १७ ऑगस्ट मारुती जगधने 

 

नांदगाव तालुक्यातील 500 दशलक्ष घनफूट क्षमतेचे माणिकपुंज धरण यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. त्यामुळे धरणाच्या पाटबंधारे क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.नांदगाव तालुक्यामध्ये मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसाची 102 मिलिमीटर एवढी नोंद झालेली आहे .

 

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे माणिकपुज धरण जलाशय जलमय झाला असून आगामी खरीप हंगामातील पिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. धरणाच्या पाण्यामुळे पाटबंधारे क्षेत्रातील शेतजमिनींना सिंचनाची सोय उपलब्ध होणार असून यंदा शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

नांदगाव तालुक्यातील शाकंभरी नदी देखील   पूर पाण्याने वाहत आहेत शाकंभरी नदीवरील देखील सर्व लहान मोठे बंधारे व धरणे तुडुंब भरली व नरीपात्र खळखळून वाहत आहे . त्यामुळे आता नांदगावकरांना तूर्त तरी पाण्याचा प्रश्न निकाली लागला .

 

वैजापूर तालुक्यात उगम पावलेलीमन्याड नदी गेल्या दोन दिवसाच्या जोरदार पावसाने दुथडी भरून वाहत असून मण्याड नदीवरील नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे .

धरण परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने पर्यटनप्रेमींनाही आकर्षण वाटू लागले आहे.

 

दरम्यान, पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

नांदगाव तालुक्यातील वाहणाऱ्या पांझन, मन्याड आणि शाकंबरी या तीन नद्यांपैकी शाकंभरी नदी आणि मन्याड नदी पूर्ण क्षमतेने वाहत आहे .गिरणा धरण देखील 60 टक्के होऊन अधिक पाणी क्षमतेने भरले?  नाग्या साक्या धरण देखील 50% भरत आलेला आहे . पावसाने जर कृपादृष्टी कायम ठेवली तर या धरणांवरती आणि नद्यांवरती देखील पूर पाणी वाहू शकेल अशी शक्यता जाणकार व्यक्त करतात .

छाया आणि व्हिडिओ : पर्यावरण प्रेमी ,सर्पमित्र व अनिस कार्याध्यक्ष प्रभाकर निकुंभ यांनी हे मनमोहक छायाचित्र टिपलेले आहे .

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!