महाराष्ट्र,देश

आकाशात उडणा-या ड्रोन चा खुलासा झाला, कोण उडवत होतं ड्रोन

आकाशात उडणा-या ड्रोन चा खुलासा झाला, कोण उडवत होतं ड्रोन

वेगवान मराठी/ भाऊसाहेब हंडोरे

 

सिन्नर/ दिनांक :21ऑगस्ट 2025: सिन्नर व संगमनेर सरहद्दीवर रात्री अपरात्री काही संशयास्पद ड्रोन आकाशात घिरट्या घालत असुन हे ड्रोन चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा भास या परीसरातील ग्रामस्थ व शेतकरी यांना झाला होता

 

त्यामुळे या परिसरात भितीयुक्त व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.. या संदर्भात अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे की सदर ड्रोन हे आर्मी च्या सर्वेक्षणासाठी उडतात त्यामुळे वावी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी सांगितले की सर्व नागरीकांना आह्वान करु इच्छितो की सध्या आपल्या गावात रात्री अपरात्री अवकाशात ड्रोन चा वापर होत आहे.

 

त्यामुळे सर्वत्र नागरीकांमध्ये भीतीचे वातावरव दहशत निर्माण झाली आहे.

परंतु नागरीकांनी घाबरून जाऊ नये कारण सदरील ड्रोन हे इंडीयन आर्मी यांचें आहे.ड्रोनद्वारे आर्मीचा सर्वे चालू आहेत सदरील ड्रोन मुळे कुठल्याही धोका निर्माण होणार नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेला घाबरून जाण्याचे कारण नाही.

 

तसेच या ड्रोन अवकाशात फीरत असल्याबाबत वेगवेगळ्या अफावाना बळी पडु नयेत व इतर नागरीकांमध्ये गैरसमज पसरवु नयेत व काही अडचणी आल्यास वावी पोलिस स्टेशनला तक्रार करा पोलिस सदैव जनतेच्या सुरक्षेसाठी गंभीर आहे.

संरक्षण विभागाचा सर्वे रात्री च का… ?

      तर हा सर्वे संरक्षण विभागाचा चा असल्याने गोपनीयता धोरणानुसार याबाबत गुप्तता बाळगली जाते .. त्यामुळे अधिकृत जाहीर न करता हे काम पूर्ण केले जात आहे..असे संरक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे…

 

व तत्पर असतात काळजी करू नये असे आवाहन वावी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे….

 

सदर ड्रोन हे सर्वे करत आहे परंतु ते रात्री अपरात्री च का उडतात.‌ दिवसभर मात्र हे ड्रोन दिसत का नाही जर शासकीय काही सर्वे करत आहेत तर तशा प्रकारची माहिती किंवा सुचत करून नागरिकांना सावध का केली जात नाही.त्यामुळे या बाबतीत नागरिक संशय व्यक्त करत आहे. दिवसा सर्वे होत नाही का त्यासाठी रात्री च का… असा सवाल सुज्ञ नागरिक करत आहेत…

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!