नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे समाज दिन ध्वजारोहण संपन्न

Nandgaon MVP Samaj din dhujaron

नांदगाव येथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ध्वजारोहण

वेगवान मराठी : दि . 20 ऑगस्ट

मारुती जगधने

नांदगांव

नांदगाव मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नांदगाव येथील विद्यालयात ध्वजारोहणाचा सोहळा दिनांक 19 ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात संस्थेचे संचालक अमित बोरसे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य दिलीप शिंदे होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच देशभक्ती, सामाजिक जबाबदारी व कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.मविप्र समाज संस्थेचा ‘समाजदिन’ उत्साहात संपन्न .

नांदगाव :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्ताने संस्थेत १९ ऑगस्ट समाजदिन म्हणून साजरा करण्यात होतो. विद्यालयाच्या प्रांगणात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल , औद्योगिक प्रशिक्षण केंद्र,आदर्श प्राथमिक शाळा , होरायझन अकॅडमी, बाह्य रुग्ण सेवा कक्ष, नांदगाव या सर्व संकुलांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेचा समाजदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे तालुका संचालक इंजि.अमित बोरसे-पाटील होते. मंचावर माजी आमदार राजेंद्र देशमुख, प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे  शरद पाटील (अध्यक्ष, महाविद्यालय व्यवस्थापन समिती),  राजाराम गवांदे (अध्यक्ष, आदर्श,शालेय व्यवस्थापन समिती),  सुनील बोरसे (अध्यक्ष आयटीआय  व्यवस्थापन समिती)  विजय काकळीज( अध्यक्ष, न्यू इंग्लिश स्कूल,शालेय व्यवस्थापन समिती),  विश्वासराव कवडे (ज्येष्ठ सभासद),  दत्तात्रय काकळीज  आनंदा गुंड  माळी ,श्रीमती विद्या पवार,  हेमंत पवार ,  रमेश अण्णा बोरसे, राजेश पाटील, नूतन कासलीवाल, .पुंजाराम जाधव,  उदय पाटील, मान्यवर उपस्थित होते.

संस्थेच्या समाज ध्वजाचे ध्वजारोहण तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संस्थेचे समाजगीत विद्यालयाच्या गीतमंचाने सादर केले.

यानंतर समाजदिन निमित्ताने रेखाटलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा.दिलीप शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. होरायझन अकॅडमीचे कलाशिक्षक सौरभ शेवरे यांनी कर्मवीर रावसाहेब थोरात व संस्थेचे बोधचिन्ह तर न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी ओम सुपेकर या नी कर्मवीर डी. आर. भोसले व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी प्रतिकृती सुंदर रेखाटली.

मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.  स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर डी आर भोसले, कर्मवीर गणपत दादा मोरे, कर्मवीर बाबुराव ठाकरे, कर्मवीर विठ्ठलराव हांडे, कर्मवीर वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून दीपक चव्हाण यांनी समाजदिनाचा मुख्य उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष . अमित बोरसे-पाटील यांचा सन्मान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी केला . तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

विजय काकळीज यांनी आपल्या मनोगतातून समाजदिनाची सुरुवात केव्हापासून झाली हे सांगितले. श्रीमती विद्याताई पाटील यांनी आपल्या मनोगतातून संस्थेविषयी आदर व्यक्त केला.

विद्यालयातील गीतमंचाने कर्मवीरांच्या जीवन कार्यावर आधारित सुंदर  पोवाडा सादर केला त्यांना मार्गदर्शक व संगीत साथ  विद्यालयाच्या संगीत शिक्षिका कल्पना आहिरे यांनी दिली.

कार्यक्रमास .गोटू गोपीनाथ निकम, . जयवंत चव्हाण, .अशोक जाधव .बाबूलाल सावंत, .सुदाम काळे,  पोपट पवार , शामराव काकळीज  दौलतराव आहेर, वामनराव घोटेकर  रामनाथ गायकवाड  दत्तात्रय काकळीज,  सुनील पगार , रामराव मोहिते , प्रभाकर कवडे,  रवींद्र कवडे  कुणाल देशमुख , किशोर शिंदे,  जनार्दन पवार,   नितीन आहेर,   अनिल आहेर,  दिलीप आहेर,  रवींद्र आहेर , मिनीनाथ चोळके ,.अरविंद पाटील, रविकांत पाटील,  कौतिक शिंदे,  तुकाराम चव्हाण, डॉ.गणेश चव्हाण, इत्यादी मान्यवर सभासद उपस्थित होते.

आपल्या  अध्यक्षीय मनोगतातून असून मनिप्र संचालक.अमित पाटील यांनी ‘बहुजन हिताय ,बहुजन सुखाय’ या संस्थेच्या ब्रीदवाक्यानुसार आपण सर्वांनी जात पात बाजूला ठेवून संस्थेचा प्रगतीचा विचार करावा. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे ,संस्थेचे विकास हेच माझे प्रामाणिक ध्येय असेल हे सांगितले. त्यांनी सर्व उपस्थित त्यांना समाजदिनाच्या शुभेच्छा दिल्या. .

प्रमुख वक्ते प्रा.दिलीप शिंदे यांनी आपल्या मनोगतातून सर्व कर्मवीरांनी संस्थेसाठी केलेल्या कार्याची परिचय करून दिली. तसेच चंदनासारखे कर्मवीरांचे कार्य सतत दरवळत राहील. सर्वांनी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहावे हे सांगितले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संकुलातील शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भिला पवार ,दत्तात्रय भिलोरे यांनी तर आभार  प्रा.संजय मराठे यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता संगीत शिक्षिका कल्पना अहिरे यांनी पसायदानाने केली.

या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!