शेती

या खरेदी विक्री केंद्रावर फळे व भाजीपाल्याच्या विक्रमी आवकेची नोंद

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.२० ऑगस्ट २०२५ :- लासलगांव बाजार समितीच्या खानगांव नजिक तात्पुरत्या खरेदी – विक्री केंद्रावर सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी फळे व भाजीपाला ह्या शेतीमालाची विक्रमी आवक झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप व उपसभापती संदीप दरेकर यांनी दिली.
लासलगांव बाजार समितीने मौजे खानगांव नजिक, खडकमाळेगांव, कोटमगांव, सारोळे खु., वनसगांव, उगांव, शिवडी, खेडे व परीसरातील इतर गावांमधील शेतकरी बांधवांच्या सोईसाठी मौजे खानगांव नजिक येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या जागेत गेल्या चार ते पाच वर्षापासुन मिरची, इतर फळे व भाजीपाला ह्या शेतीमालाचे लिलाव सुरू केलेले आहे. दरवर्षी सदर शेतीमाल लिलावास व्यापारी व शेतकरी बांधवांकडुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दिवसेंदिवस सदर खरेदी – विक्री केंद्रावर मिरची, इतर फळे व भाजीपाला शेतीमाल खरेदी-विक्रीची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे.
गेल्या चार ते पाच वर्षाच्या तुलनेत सदर खरेदी – विक्री केंद्रावर सोमवार दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजी फळे व भाजीपाला ह्या शेतीमालाची विक्रमी आवक होऊन सुमारे ५५० वाहनांमधुन मिरची (हिरवी, पिकेडोर, ढोबळी, ज्वेलरी, बुलेट), काकडी, वाल, घेवडा, भोपळा, वांगी, कारले, दोडके, गिलके, आले, कोबी, फ्लॉवर, मेथी, कोथंबीर अशा विविध प्रकारच्या फळे व भाजीपाल्याच्या २८,२४१ बॅग विक्रीस आल्या होत्या. विक्रीसाठी आलेल्या सर्व शेतीमालाचे वेळेत लिलाव, वजनमाप व चुकवती इ.प्रक्रिया पार पाडणेसाठी बाजार समितीचे सर्व अडते, व्यापारी, शेतकरी, कामगार वर्गाचे मोठे योगदान असल्याचे सभापती ज्ञानेश्वर जगताप यांनी सांगितले.

यावेळी बाजार समितीचे उपसभापती संदीप दरेकर व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सदर खरेदी-विक्री केंद्रास समक्ष भेट देऊन शेतीमाल विक्रीसाठी आलेल्या आवकेचा आढावा घेऊन अडते, व्यापारी व कामगार वर्गास जलदगतीने लिलावाचे व वजनमापाचे कामकाज करून शेतकरी बांधवांना रोख चुकवती अदा करणेसाठी सुचना दिल्या. सदर प्रसंगी बाजार समितीचे लिलाव पुकारणार कामगार तुषार शेजवळ यांनी आलेल्या सर्व शेतीमालाचा लिलाव सलग पुकारला, त्याबद्दल त्यांचा बाजार समिती, शेतकरी व व्यापारी वर्गाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

■ हि अभुतपुर्व आवक हा शेतकरी बांधवांचा विश्वास, अडते व व्यापाऱ्यांचा उत्साह, कामगार व गाडीचालकांचे कष्ट तसेच बाजार समितीच्या सेवक वृंदाचे अथक प्रयत्न यांचे फलित आहे. या यशामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे लासलगांव बाजार समितीतर्फे हार्दिक अभिनंदन व आभार.
ज्ञानेश्वर जगताप
सभापती, लासलगाव कृ.ऊ.बा.समिती

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!