
वर्ल्ड फोटोग्राफी डे नांदगाव येथे उत्साहात साजरा
वेगवान मराठी : दि . 19 ऑगस्ट
मारूती जगधने
नांदगाव येथे जागतिक फोटोग्राफर दिन उत्साहात साजरा झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फरान दादा पठाण होते .
नांदगाव : – नांदगाव शहरात जागतिक फोटोग्राफर दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून नांदगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे रविवार दि. 19 ऑगस्ट रोजी स्थानिक गुप्ता लॉन्स सभागृह येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीं गणेशच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.
त्यानंतर दिवंगत छायाचित्रकारांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून
तसेच तालुक्यातील विविध संस्थांचे व राजकीय पदाधिकारी पत्रकार नामवंत फोटोग्राफर उपस्थित होते.
🪶 या वेळी फोटोग्राफी क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ काम करून आपले विशेष स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ छायाचित्रकार . प्रकाश गुप्ता . दिलीप दंडगव्हाळ गुप्ता काका यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे तरुण छायाचित्रकाराना प्रेरणा देणाऱ्या छायाचित्राचे कौतुक करण्यात आले.
“आधुनिक तंत्रज्ञानाचा फोटोग्राफीवर परिणाम” या विषयावर पोलीस नि . भदाणे . यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी मोबाईल फोटोग्राफी, ड्रोन कॅमेऱ्याचा वापर, डिजिटल एडिटिंग, तसेच सोशल मीडियामुळे फोटोग्राफीला मिळालेली नवी दिशा याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी फोटोग्राफर समाजाचे समाजकारणातील योगदान अधोरेखित केले. “फोटोग्राफी ही केवळ उपजीविकेचे साधन नसून ती एक जिवंत कला आहे. एखाद्या क्षणाचे चित्रण करून तो इतिहासात जतन करण्याचे कार्य फोटोग्राफर करतात”, असे उद्गार . माजी नगर अध्यक्ष राजेश कवडे यां नी व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या .
यावेळी आयोजकांनी भविष्यात छायाचित्र स्पर्धेचेआयोजन करण्यात यईल .
तालुक्यातील सुमारे शेकडो हून अधिक फोटोग्राफरांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. “निसर्ग”, “सण-उत्सव”, “समाजाचे रंग” या बाबत पत्रकार संजीव धामणे, संजीव निकम, हानीफ चांद शेख यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या . उपस्थितांना तसेच फोटोग्राफरांना विजेत्यांना ट्रॉफी, व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले .
या सोहळ्यात अनेक तरुण फोटोग्राफरांनी आपले अनुभव सांगितले व भविष्यातील उद्दिष्टे मांडली. कार्यक्रमाच्या शेवटी फोटोग्राफर संघटनेशहरातील सर्व छायाचित्रकार, पत्रकार, मान्यवर नागरिक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी अनेक मान्यवर फोटोग्राफर आपल्या परिवारासहित या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते आणि त्यांनी ग्रुपने फोटो घेण्याचा देखील फोटोग्राफ यांनी आनंद घेतला .
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद फरान पठाण यांनी भूषविलेप्रमुख प्रवक्ते म्हणून राजेश ठाकूर हे उपस्थित होते यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे संजीव निकम आणि संजीव धामणे, बब्बु शेख यांनी फोटोग्राफर असोसिएशन यांना हार्दिक शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना फरान पठाण म्हणाले की अनेक लोक पैसे बुडवतात त्यासाठी फोटोग्राफरने ऍडव्हान्स घेतल्याशिवाय कोणतेही काम स्वीकारू नये असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. यावेळेला सर्वांच्या चेहऱ्यावरती हसू उमटले होते
या कार्यक्रमासाठी नांदगाव तालुका फोटो ग्राफर असोसिएशनचे मार्गदर्शक चंचल गंगवाल,विजय भावसार, अध्यक्ष अनिल शिंदे, उपाध्यक्ष मंगेश सोनस, उपाध्यक्ष निलेश बोरसे,सचिव गणेश सरोदे, कार्याध्यक्ष सचिन पांडे, खजिनदार दत्तु आवारे,सहखजिनदार निलेश्वर पाटील, तांत्रिक प्रमुख दिनेश रुणवाल प्रसिद्ध प्रमुख सचिन दंडगव्हाळ व सुहास पुणतांबेकर, शंकर विसपुते, नाना अहिरे ,दत्तू आवारे निलेश्वर पाटील सचिन पांडे दिनेश रुणवाल सचिन दंडगव्हाळ , फोटो ग्राफर असोसिएशनचे सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला नांदगाव व मनमाड शहरातील पत्रकार बांधव देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र तुरकुणे यांनी केले तर आभार सचिन पांडे यांनी मानले.



