नांदगावला दमदार पाऊस
धुवाधार पावसाची बॅटिंग – नांदगाव शहर व पंचक्रोशी परिसरात जल्लोष
वेगवान मराठी ( दिनांक 15 ऑगस्ट ) :
मारुती जगधने
नांदगाव शहरातील रेल्वे भुयारी मार्गावर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल
नांदगाव शहरातून जाणाऱ्या रेल्वेच्या भुयारी मार्गावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने पादचारी आणि वाहनचालकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर हा मार्ग पाण्याखाली गेला असून, दुचाकी, सायकलस्वार आणि लहान वाहनधारकांसाठी प्रवास धोकादायक ठरतो आहे.
पाणी साचल्यामुळे काही वाहनांचे इंजिन बंद पडले, तर पादचाऱ्यांना ओले होऊनच मार्गक्रमण करावे लागले. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह कामावर जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे.
नागरिकांच्या मते, भुयारी मार्गाच्या निचऱ्याची व्यवस्था अपुरी असून, दर पावसाळ्यात अशीच स्थिती उद्भवते. स्थानिक प्रशासनाने तात्काळ पंपिंगसह पाणी काढण्याची आणि कायमस्वरूपी निचऱ्याची सोय करण्याची मागणी जोर धरत आहे.
नांदगाव शहरासह पंचक्रोशी परिसरात आज सायंकाळी पाच वाजल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक काळेकुट्ट ढगांनी आकाश व्यापले आणि काही क्षणातच मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू झाली. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले, तर काही ठिकाणी वाहतूक संथगतीने सुरू राहिली.
शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ व निवासी भागात पावसामुळे थंडावा निर्माण झाला. ग्रामीण भागातही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर दिसून आली. खरीप पिकांना मोठा फायदा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला, तर पावसाच्या जोरदार सरींनी वातावरण आनंददायी केले.
दरम्यान दिनांक 14 व रोजी देखील रात्री नऊ वाजता सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत चालू होता14 आणि 15 ऑगस्ट रोजी तथा गोकुळाष्टमी रोजी
देखील पाऊस चांगला झाला . शहर व पंचक्रोशी मध्ये खेड्यापाड्यामध्ये गावागावांमध्ये घरोघरी गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे .शासनाने दिलेल्या गोमास बंदीला अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले .
गोकुळाष्टमीमुळे आणि श्रावण महिन्यामुळे मावसा आहारावर मोठे परिणाम होत असतात अनेक नागरिक उपवास धरत असतात श्रावण महिन्यामध्ये जवळपास मांसाहार बंदच असतो .त्यामुळे मटन चिकन वरती बंदी संदर्भात ग्रामीण भागात कोणतेही पडसाद उमटले नाही नांदगाव शहर पंचक्रोशी मध्ये सर्व व्यवहार सुरळीत होते .



