नांदगाव तालुक्यात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांचा दिलासा
वेगवान मराठी : ता १५ ऑगस्ट
मारूती जगधने
रात्रीचे साडेबारा वाजले या दरम्यान पावसाने नांदगाव तालुक्यात जोरदार सुरुवात केलीतसे दिनांक 14 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेपासून पावसाने सुरुवात केली होती तो रात्री उशिरापर्यंत चालूच होता .
मध्यम स्वरूपाच्या पावसाने नांदगाव शहरासह पंचक्रोशीत आणि तालुक्यात हजेरी लावल्याच्या वार्ता आहे या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असून नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणत्याही नदीला पुरेसे पूर पाणी आलेलं नव्हतं .मात्र पावसाच्या आगमनाने शेतकरी शेतमजूर नागरिक समाधान व्यक्त करतात .
नांदगाव तालुक्यात अनेक दिवसांपासून पावसाने उशीर लावला होता. त्यामुळे खरीप हंगामातील पिके कोमेजण्याच्या स्थितीत आली होती. मात्र १४ ऑगस्ट रोजी मुक्कामी पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी दिलासा व्यक्त केला आहे. या पावसामुळे सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांना मोठा फायदा होणार असून पिकांची वाढ जोमाने होण्याची अपेक्षा आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, येत्या पोळा सणाला गावागावात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. तसेच १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचाही उत्सव उत्साहात साजरा होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पावसाच्या आगमनामुळे नांदगाव तालुका हिरवागार होण्यास सुरुवात झाली आहे.



