बागलाण तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत ‘मल्हार हिल विद्यालयाचे’ यश व जिल्हास्तरावर निवड..

वेगवान नासिक /तुषार रौंदळ
विरगाव दि. 12 ऑगस्ट 2025 :-
बागलाण तालुकास्तरीय आयोजित शालेय क्रीडा स्पर्धांपैकी ‘कुस्ती’ या क्रीडा प्रकारात १४ वर्षाखालील वयोगटातून ५७ किलो वजनी गटात ‘मल्हार हिल प्राथ व माध्यमिक विद्यालय, भाक्षी ‘ येथील इ.८ वी तील विद्यार्थी “कु. कृष्णा लक्ष्मण खैरनार ” व १७ वर्ष वयोगटातून ४५ किलो वजनी गटात इयत्ता १०वी चा लहू सतीश खैरनार याने अंतिम फेरीतील चूरशीच्या सामन्यात प्रतिस्पर्ध्याचा दणदणीत पराभव करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
विजयी कुस्तीपटू विद्यार्थी “कृष्णा खैरनार व लहू खैरनार यांचा ,बागलाण चे आमदार ‘ना.श्री दिलीप बोरसे साहेब’ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कृष्णाच्या व लहू यांच्या दैदिप्यमान अशा यशाबद्दल त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे तसेच त्यांना मार्गदशन करणारे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक ‘श्री.रोहित सोनवणे यांचे,संस्थेचे अध्यक्ष मा.श्री भालचंद्र कोठावदे ऊर्फ काकाश्री यांनी विशेष अभिनंदन केले.तसेच बागलाण गट शिक्षणाधिकारी मा.श्रीमती चित्रा देवरे मॅडम,पं.स.शिक्षण विस्ताराधिकारी मा.श्री हिरालाल बधान साहेब,केंद्रप्रमुख पगारे साहेब,विद्यालयाचे मुख्या.श्री पी.एन. दातरे सर तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



