नाशिक ग्रामीण

या तालुक्यात शालेय बस–दुचाकी अपघात; एकाचा मृत्यू, 

Nandgaon News

या तालुक्यात शालेय बस–दुचाकी अपघात; एकाचा मृत्यू,
वेगवान मराठी : मारुती जगधने
दि 23 ऑक्टोंबर 2025
नांदगाव तालुक्यातील जातेगाव–बोलठाण रस्त्यावर सोमवारी (२२) दुपारी सुमारे ३ वाजता शालेय बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.
‘डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल’ची बस (क्रमांक MH.20 TC-6468) आणि ‘शाईन’ दुचाकी (क्रमांक MH.41 BU-4576) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील राकेश धोंडीराम खैरनार (वय २८, रा. न्यायडोंगरी) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर प्रकाश नारायण पवार (वय ५५, रा. न्यायडोंगरी) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
जखमी प्रकाश पवार यांना प्रथम बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय अधिकारी अनुराग पवार यांनी दिली.
दरम्यान, नांदगाव–बोलठाण मार्गावरील कासारे घाट, चांदेश्वरी घाट, कुसुमतेल ढेकू आणि जातेगाव परिसरात रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे वळणांवरून येणारी वाहने दिसण्यास अडथळा ठरत आहेत. यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!