वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येवला तालुक्यातील बाभुळगाव शिवारातील अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत १.०९ लाख रुपये रोख, दोन कार, दोन दुचाकी, मोबाईल असे एकूण १०.५० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यातील आरोपी:
संतोष पंढरीनाथ जगताप (४६, अंदरसुल)
बाबासाहेब बापुराव सुरासे (४०, बाभुळगाव)
मनोहर तुकाराम आहेर (२८, डोंगरगाव)
राम सुरेश भड (२९, धामोडा)
राज कांबळे (पाटोदा – फरार)
सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, ३ ऑगस्ट रोजी कोपरगाव रोड परिसरात गस्तीदरम्यान हॉटेल कैलासजवळ परप्रांतीय शरबजीत रामलाल यादव (४०, मूळ रा. उत्तरप्रदेश) हा देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसेसह आढळून आला. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
ही दोन्ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोउनि प्रकाश भालेराव, पोलीस अंमलदार गोरक्षनाथ संवत्सरकर, रावसाहेब कांबळे, योगिता काकड, प्रविण काकड, सागर काकड, विश्वनाथ धारबळे, संतोष दोंदे, एकनाथ हळदे, केतन कापसे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने केली.