
रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला..!
वेगवान मराठी : मारुती जगधने दिनांक 3 ऑगस्ट
आज चिपळूण येथील अतिथी सभागृहात शिवसेना कार्यकारिणीची बैठक पार पडली. यात चिपळूण आणि गुहागर येथे आपला आमदार नसला तरी महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून शिवसेना पक्ष वाढीसाठी जी विकासकामे करता येतील त्यासाठी मी बांधील आहे, अशी ग्वाही ना . उदय सामंत यांनी दिले प्रसंगी दिली.
तसेच संघटनात्मक घडामोडी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महत्त्वाच्या सर्व बाबींवर सखोल चर्चा झाली. यावेळी सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणावर करून शिवसेना घराघरात पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन केले.
या बैठकीत उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
यावेळी पालकमंत्री . उदय सामंत, शिवसेना सचिव . किरण पावसकर, . आमदार किरण सामंत, उपनेते . संजय कदम, उपनेते . सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख . शशिकांत चव्हाण, जिल्हाप्रमुख . राहुलजी पंडीत, महिला आघाडी संघटक श्रीमती रश्मीताई गोखले, महिला आघाडी संघटक श्रीमती रचनाताई महाडीक, जि. प. माजी बांधकाम सभापती . अण्णा कदम तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम . दि ०२ ऑगस्ट २०२५ | चिपळूण नेथे संपन्न झाला यासाठी मंत्री योगेश कदम यांनी विषे श योगदान केले .



