नाशिक ग्रामीण

निफाड तालुक्यात ११७ पैकी या ५९ ग्रामपंचायतींमध्ये ‘लाडकी बहीण’ गाजवणार सत्ता

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.३० जुलै २०२५ :- निफाड तालुक्यातील मुदत संपलेल्या ११७ ग्रामपंचायतींमध्ये सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी थेट महिला सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज (३० जुलै) तहसील कार्यालयात काढण्यात आली. यामध्ये ५९ ग्रामपंचायतींमध्ये महिला उमेदवारांना आरक्षण मिळाले असून, आगामी काळात ‘लाडकी बहीण’ या गावांमध्ये सत्तेवर विराजमान होणार आहे.

तहसीलदार मा. विशाल नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत पार पडली. नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रक्रियेमुळे गावपातळीवर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

◆ महिलांना न मिळालेल्या संधींचा विचार :
सन २०२० ते २०२५ या कालावधीत ज्या ग्रामपंचायतींमध्ये महिलांना सरपंचपदाचा लाभ मिळाला नव्हता, अशा ३२ पैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा महिला आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. यामध्ये खालील गावांचा समावेश आहे
अनुसूचित जमाती (स्री): कानळद, कुंभारी, पंचकेश्वर, पाचोरे खु.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्री): कुंदेवाडी, सारोळेथडी, तामसवाडी, थेरगाव
सर्वसाधारण (स्री): नारायण टेंभी, सारोळे खुर्द, वेळापूर, कुरडगाव, हनुमाननगर

◆ नवीन आरक्षणानुसार महिला आरक्षित ग्रामपंचायती:
अनुसूचित जाती (स्री) – ८ पैकी ४ : दिक्षी, ओणे, रुई (धानोरे), खडकमाळेगाव (खानगाव नजीक)

◆ अनुसूचित जमाती (स्री) – ८ पैकी ४ : खेडे, नैताळे (रामपूर), दावचवाडी, धारणगाव वीर

◆ मागास प्रवर्ग (स्री) – २३ पैकी १२ : भुसे, खानगाव थडी, चापडगाव, शिरवाडे वणी, बोकडदरे, चांदोरी (नागापूर), भरवस (मानोरी खुर्द), साकोरे मिग, थेटाळे, चाटोरी, गोंडेगाव, अंतरवेली

◆ सर्वसाधारण प्रवर्ग (स्री) – ४६ पैकी शिरसगाव, पिंपळगाव नजीक, लासलगाव, महाजनपूर, उगाव, वाहेगाव दहेगाव, गाजरवाडी, दारणा सांगवी, पिंपळगाव निपाणी (सावळी), रौळस, बेहेड, रसलपूर, रामनगर, म्हाळसाकोरे, सायखेडा, करंजी खुर्द (ब्राह्मणवाडे), शिरवाडे वाकद, मुखेड, मांजरगाव, टाकळी विंचूर, ब्राम्हणगाव वनस, सोनेवाडी खुर्द, काथरगाव, तारुखेडले, कोटमगाव, वाकद या २६ ग्रामपंचायतींमध्ये महिलांना सरपंचपदासाठी संधी मिळाल्यामुळे ग्रामराजकारणात महिला नेतृत्वाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!