
मनोज वैद्य / देवळा
२९ जुलै २०२५
लोहोणेर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ.मोहीनी आहेर यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदावर रेश्मा रमेश महाजन यांची आज दिनांक २९ जुलै रोजी बिनविरोध निवड करण्यात आली, यावेळी त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा केला.

सरपंच पदाच्या निवडीसाठी बोलविण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत आज दिनांक २९ जुलै रोजी प्रसादबापु देशमुख व राकेश गुळेचा यांच्या नेतृत्वाखाली सौ.रेशमा रमेश महाजन यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने मंडळ अधिकारी मनोहर गांगुर्डे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात सौ.रेश्मा महाजन यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत केले. यावेळी ग्रामपंचायतीच्या १७ सदस्यांपैकी १२ सदस्य बैठकीला हजर होते.
त्याप्रसंगी बाळासाहेब बच्छाव, आबासाहेब देशमुख, मंगलचंद गोगड, पॅनल प्रमुख प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा, उपसरपंच प्रतिभा सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सतिष देशमुख, निंबा धामणे, रतिलाल परदेशी, धोंडु आहीरे, चंद्रकांत महाजन, भाऊसिंग गायकवाड, मोहीनी आहेर, पुनम पवार, उषाबाई सोनवणे, विजया मेतकर, ग्रामविकास अधिकारी संदीप खेबडे, दिगंबर कोठावदे, अशोक अलई, नानाभाऊ जाधव, जिभाऊ बागुल, राजेंद्र महाजन, दिपक देशमुख, प्रभाकर आहीरे, संजय परदेशी, दादाजी शेवाळे, अशोक आहीरे, बाळु वाघ आदी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी नाना पाठक, समाधान महाजन, योगेश पवार, प्रसाद देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर रमेश आहीरे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.



