Uncategorized
आला” दिवाळी – दसरा ” आता आनंदाचा शिधा विसरा… ! योजनेला ब्रेक लागण्याची शक्यता

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि. 6 ऑक्टोंबर 2025 —-
Wigwam news / — आला दिवाळी दसरा … आता आनंदाचा शिधा विसरा… ! असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य ग्रामस्थांवर आली… कारण शिंदे सरकारने सुरू केलेल्या या योजना बासनात गुंडाळून ठेवली जाते आहे का.. या संदर्भात ग्रामीण भागातील जनतेला पडलेल्या प्रश्न निर्माण झाला आहे…
बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळी या उत्सवांच्या काळात सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा दिला होता. पांढरी शिधापत्रिकाधारक वगळून अन्य प्रत्येक शिधापत्रिकेसाठी प्रत्येकी एक किलो पामतेल, रवा, चणाडाळ व साखर असे चार जिन्नस १०० रुपयांमध्ये देण्यात येत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचे लाडकी बहिण योजना अंमलात आणली व झटपट निर्णय घेतला… परंतु या योजना सुरू असताना राज्य सरकार प्रचंड अडचणींत असून आता हि योजना चालू ठेवण्यासाठी सरकारला मोठी कसरत करावी लागते आहे.. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना बंद होण्याच्या मार्गावर असून या वर्षी दिवाळीत आनंदाचा शिधा वाटप होणार नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे… कारण लाडकी बहिण योजना अंमलात आणली तेव्हा पासून शासकीय विकास कामांना ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत असतानाच मोठ्या दिमाखात सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना सरकारने बासनात गुंडाळून ठेवली जाते आहे का… असा सवाल महाराष्ट्रतील जनतेला पडला आहे,…
- कारण या वर्षी दिवाळीत आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे…



