नाशिक ग्रामीण

खा, संजय राऊत यांच्या वर नाशिक मध्ये गुन्हा दाखल…. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात अपप्रचार केल्याने पडले महागात…

,,, खा, संजय राऊत यांच्या वर नाशिक मध्ये गुन्हा दाखल.... मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात अपप्रचार केल्याने पडले महागात...

वेगवान मराठी. ( नाशिक )    /    मारुती जगधाने

नांदगाव : दि , 28 जुलै 2025 — खा, संजय राऊत यांच्या वर नाशिक मध्ये गुन्हा दाखल…. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात अपप्रचार केल्याने पडले महागात…

,,,  खासदार संजय राऊत यांच्यावर अ . द . गुन्हा दाखल ,,,,

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अश्लील,अपमानास्पद, वैयक्तिक स्वरुपाची आणि सामाजिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याने नांदगाव जि नाशिक शहरात याचे पडसाद उमटले असून शहरातील भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष संजय सानप यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.भारतीय जनता पार्टी ही एक रेव्ह पार्टी आहे.गिरीश महाजन नावाचा सांड हा मोकाट सुटलेला आहे. याला जर आवरले नाही तर एक दिवस देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही असे दिलेल्या निवेदनात म्हटले असून संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात मोर्चा काढत खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने राऊत यांच्यावर रात्री 11 वाजेच्या सुमारास 356/1, 351/4 नुसार अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली आहे.या वेळी भाजपा नांदगाव मंडल तालुका अध्यक्ष संजय सानप,रेखा शेलार,सतीश शिंदे,बाबाजी शिरसाठ,ताराबाई शर्मा,धनराज मंडलिक,बळवंत शिंदे,दिनेश जेजुरकर,कृष्णा देहाडराय,गणेश शर्मा,नितीन रावआंदोरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!