आर्थिक

..अन्यथा नाशिक जिल्हा बँक आम्ही शेतकरी मिळूनच बुडवणार — भागवतराव सोनवणे –

..अन्यथा नाशिक जिल्हा बँक आम्ही शेतकरी मिळूनच बुडवणार -- भागवतराव सोनवणे -

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला | 21 जुलै 2025

नाशिक जिल्ह्यातील 54 हजार 40 शेतकऱ्यांकडे मध्यम मुदतीचे ₹902 कोटी मुद्दल थकीत आहे. या मुद्दलीचे व्याज ₹1200 कोटीवर गेले आहे.

थकीत शेतकरी जिल्हा बँकेच्या जप्तीच्या कारवाईमुळे देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे.
राज्य शेतकरी समिती आणि कर्जमुक्ती अभियान नाशिक जिल्हा बँक यांच्या प्रतिनिधींनी राज्याचे जेष्ठ मंत्री नामदार छगन भुजबळ यांना जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या बाजूने उभे रहावे, मध्यम मुदतीच्या कर्जास संपूर्ण व्याजमुक्ती मिळवून द्यावी असे साकडे घातले.

मात्र नाशिक जिल्हा बँक कोणी डबघाईस आणली याचा शेतकऱ्यांनी शोध घ्यावा, मी माझ्या परीने सरकार कडे प्रयत्न व्याजमुक्ती साठी प्रयत्न करेल असे आश्वासन शेतकरी कर्ज मुक्ती अभियानाच्या शिष्टमंडळास येवला येथे दिले…

तर आम्हीच जिल्हा बँक बुडवणार….

“संपूर्ण व्याज माफी दिल्यास आणि मुद्दल भरून निरंक दाखले दिल्यासच 54 हजार शेतकरी मुद्दल भरतील,

अन्यथा बँकेचा 13 वा आणि श्राद्ध आता ठरलेले आहे.
कुठल्याही जप्ती व वसुली, ताबा अधिकारी, पोलीस बळ यांना बांधाच्या आत येऊ देणार नाही.
राज्य सरकार आणि बँक यांनी व्याजाचा बोजा सहन करावा…

व्याजाची थकहमी सरकारने द्यावी, अन्यथा जमीनी लिलावात गेली तरी चालेल, पण
शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन जर सरकारला मान्य नसेल तर आगामी काळात शेतकरी आत्महत्या होतील…

आणि जिल्हा बँकेचे श्राद्ध आम्हीच घालू…
आम्ही मुद्दल भरली तरच बँक वाचू शकते हे सरकारने लक्षात घ्यावे…”

— भागवतराव सोनवणे
संयोजक, शेतकरी कर्जमुक्ती अभियान

मध्यम मुदत कर्जावरील “शून्य टक्के व्याज” योजना व 10 सुलभ हप्त्यांमध्ये परतफेडीची सवलत दिल्यासच परतफेड करू, अन्यथा 1 रुपया देखील भरणार नाहीं, अशी भूमिका राज्य शेतकरी संघटना समन्वय समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांनी मांडली…

नाशिक जिल्ह्यातील 775 दिवसांपासून सुरू असलेल्या शांतीपूर्ण आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आजवर स्पष्ट भूमिका न घेतल्याने नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.

54 हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे 8 हजार शेतकरी हे येवला विधानसभा मतदारसंघातील आहेत.
म्हणून यावर मंत्री छगन भुजबळ यांनीच पुढाकार घ्यावा, अशी मागणी नानासाहेब बोंबले यांनी केली…
यावेळी सुधाकर ठोंबरे,मुक्ती क्टर गणेश जेजुरकर, छबू सोमासे, माधव बोंबले, अनिल कदम, नवनाथ निकम, एकनाथ भालेराव, भाऊसाहेब सोमासे आदिसह कर्जदार शेतकरी उपस्थित होते.

15 ऑगस्ट ला 54 हजार कर्जदार शेतकरी येवल्यात
— मोतीराम पाटील, जेष्ठ शेतकरी नेते, निफाड
*******
राज्य सरकारमधील जेष्ठ मंत्री छगन भुजबळ हेच आता शेतकऱ्यांना व्याजमुक्ती मिळवून देतील,
त्यासाठी केंद्र आणि राज्य यांचे अनुदान आणि थकहमी देऊन लिलावग्रस्त जमिनी वाचवतील अशी धारणा आता शेतकऱ्यांची झाली आहे.

कर्जमुक्ती अभियानाचा केंद्रबिंदू मंत्री भुजबळ यांचा मतदारसंघ असेल, येवल्यात हलवले जाईल
आणि आणखी तीव्र लढा दिला जाईल, असे यावेळी बोलताना निफाड तालुक्यातील शेतकरी नेते मोतीराम पाटील यांनी सांगितले.

🔴 कर्जदार शेतकऱ्यांची स्थिती गंभीर

थकीत मुद्दल: ₹901.79 कोटी

माफ केले जाणारे व्याज: ₹620.11 कोटी

शिल्लक व्याज मागणी: ₹679 कोटी

🟢 शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:

1. शून्य टक्के व्याज योजना तातडीने जाहीर करावी

2. 10 सुलभ हप्त्यांत मुद्दल परतफेड योजना लागू करावी

3. बँकेकडून सुरू असलेली जमीन लिलाव/जप्तीची प्रक्रिया थांबवावी

✅ फोटो :- व्याज मुक्ती साठी मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देताना कर्जबाजारी शेतकरी

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!