,,, या शहरात 25 लाखांचा गुटखा जप्त : सिन्नर पोलीसांची धडाकेबाज कारवाई ….
सिन्नर मध्ये 25 लाखांचा गुटखा जप्त : सिन्नर पोलीसांची धडाकेबाज कारवाई ....

वेगवान नाशिक / शरद शेळके
,,,, सिन्नरमध्ये लाखोंचा गुटखा जप्त,सिन्नर पोलिसांची कारवाई …. !
सिन्नर, दि, 21 जुलै 2025 — राजरोसपणे गुटखा ची वहातुक करणारे माफिया यांना जेरबंद करण्यात सिन्नर पोलीसांना यश आले आहे.पोलीसांची धडाकेबाज कामगिरी केली असून लवकरच गावोगावी सर्रासपणे गुटखा विक्री सुरू आहे ती त्वरित थांबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे…
माल वाहतुकीच्या नावाखाली परराज्यातील गुटखा विक्रीस पाठविला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिन्नर पोलिसांनी बारागाव पिंपरी रोडवर कोर्टासमोर कारवाई करुन साडेतेरा लाखांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सिन्नर पोलिसांनी सिन्नर बारागाव पिंप्री रोडवर कोर्टासमोर सापळा रचून आयशर गाडी क्र. MH ०३ DV ५७५२ ताब्यात घेतली.सदर गाडीचे चालकास विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव समशाह अहमद जुल्फेखार,वय ४७ वर्ष, रा नेवादा,उत्तर प्रदेश असे सांगीतले.
याबाबत अन्न व औषध प्रशासनास माहिती दिल्याने त्यांचेकडील संदीप दयानंद तोरणे यांनी पथकासह दोन पंचासमक्ष आयशर वाहनातील मालाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीवर बंदी असलेला १३,लाख ४६ हजार ,३८० रुपये किंमतीचा गुटखा व १२ लाख रुपये किंमतीचा आयशर गाडी सह एकूण २५ लाख ४६,हजार ३८० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने अन्न व औषध प्रशासन पथकाने पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करुन सिन्नर पोलीस ठाणेस फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात कऱण्यात आला आहे.
सदरची कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक कैलास खैरनार, पोलीस हवालदार हरीश आव्हाड, नितीन डावखर, समाधान बोराडे, पोलीस नाईक भारत पवार, विलास बिडगर पोलीस शिपाई प्रशांत सहाणे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केली.



