नाशिक ग्रामीण

साकोरा तालुका नांदगाव येथील पाणी योजना बासनात गुंडाळली?

Nandgaon news

वेगवान मराठी :मारुती जगधने तालुक्यातील साकोरा गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. दोन वर्षांपासून या योजनेचे काम सुरू होते. योजना प्रत्यक्षात राबवण्यात आली असली तरी अद्याप नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. ठिकठिकाणी योजना बिघडत असून, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. या सततच्या पाणीटंचाईमुळे व योजनेतील त्रुटींमुळे ग्रामस्थ, विशेषत: महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

 

 

सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून साकोरे तालुका नांदगाव येथे गिरणा धरणातून जलजीवन मिशन पाणी योजना राबविण्यात आली या योजनेसाठी अनेक दिवस खर्ची आले कोट्यावधी रुपये पण खर्च झाले पण या योजनेचा साकोरे गावच्या ग्रामस्थांना अद्यापही पुरेसा लाभ मिळालेला नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना पाण्यासाठी पावसाळ्यात देखील शोधाशोध करावी लागत आहे गिरणा धरणात मुबलक पाणी आहे परंतु जल जीवन मिशन योजनेतील जलवाहिन्या ह्या ठिकठिकाणी सातत्याने लिकीज होत असल्याने पुरेसे दाबाने पुरेसे पाणी साकोरेकरांना मिळत नाही त्यामुळे विशेष करून महिला वर्गात पाणी योजनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे .

 

संपूर्ण उन्हाळ्यामध्ये ही पाणी योजना राबवण्यासाठी गावाने रेटा लावला होता आता तरी मुघलक पाणी आपल्याला मिळेल अशी आशा गावातील नागरिकांना महिलांना होती परंतु पावसाळ्याच्या ऑगस्ट महिन्यात देखील महिलांना पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे .

 

घरची कामे करावी शेतीची कामे करावी की पाण्याचा शोध घ्यावा कपडे कुठे धुवायचे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते वापराचे पाण्याची तीच अवस्था झाली आहे या गावाला यापूर्वी देखील दोन पाणी योजना मन्याड योजना  मन्याड नदीपात्रातून राबवण्यात आले होते त्यादेखील कालवा हे झालेले आहे आता ही तिसरी मोठी योजना नागरिकांना आशादायी ठरत होती परंतु ही योजना देखील साकोरे गावासाठी फोल ठरलेली आहे .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!