नाशिक जिल्ह्यात आकाशातून एक ड्रोन का उडतंय — सावधान … ?
रात्री आकाशात घिरट्या मारणारं ड्रोन मागचं कारण गुलदस्त्यातच....

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर दि 14 ऑगस्ट 2025 — सिन्नर तालुक्यातील पुर्व भागातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या अंधारात ड्रोन घिरट्या घालत असुन हे ड्रोन नेमके कोण उडवत आहेत आणि कशासाठी… हे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. तालुक्यातील समृद्धी नागपूर हायवे लगत सिन्नर तालुक्यातील हाताळले, मलढोण, देवकौठे,कहांडळवाडी, दुसंग वाडी.घोटेवाडी, आशापिर डोंगर परिसरात तसेच संगमनेर हद्दीतील पारेगाव.चिंचोली.तळेगाव या गावातील घराच्या परिसरात. वस्तीत राहणारे शेतकरी कुटुंबातील घरावर गेल्या आठ दिवसांपासून दोन ते तीन ड्रोन आकाशात कमी उंचीवर घिरट्या घालीत आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जिव मुठीत धरून रात्र काढावी लागते.. यासंदर्भात या हद्दीतील वावी पोलिस स्टेशनला विचारले असता त्यांनी यावेळी सांगितले की… भिंती युक्त व धोकादायक असं कुठलंही कृत्य निदर्शनास आले नाही…
सध्या आपल्या भागात एक अत्यंत नियोजित आणि धोकादायक चोरांची टोळी सक्रिय आहे. आश्चर्यकारक म्हणजे यात काही महिलांचाही समावेश आहे. या टोळीची काम करण्याची पद्धत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जुने गुन्हेगारी डावपेच यांचा संगम आहे.
—
,,, टोळीची चोरी करण्याची पद्धत
ड्रोनद्वारे आधी टेहळणी – गावात किंवा वस्तीत काही दिवस ड्रोन फिरवून प्रत्येक घराची स्थिती, सुरक्षिततेची पातळी आणि घरातील लोकांची हालचाल नोंदवली जाते.
घरांचा कच्चा नकाशा तयार करणे – घरात प्रवेशाचे मार्ग, बाहेरील लाईट्स, CCTVची ठिकाणे, शेजारी घरांची जवळीक इ. सर्व माहिती गोळा करून योजना आखली जाते.
एका रात्रीत ५ ते १० घरे फोडणे – ही टोळी एकाच रात्रीत अनेक घरांवर हल्ला करते, जेणेकरून लोक आणि पोलीस गोंधळून जातात.
चोरीपूर्वी गोंधळ निर्माण करणे – घराबाहेर दगड किंवा मोठा आवाज करणारी वस्तू फेकून घरातील लोकांना बाहेर काढतात.
हल्ला व मारहाण – बाहेर येताच घरातील सदस्यांवर हल्ला करून त्यांना बेशुद्ध किंवा घाबरवून ठेवतात.
घरातील मालमत्ता लुटणे – सोने, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक्स, मौल्यवान वस्तू पटकन उचलून नेल्या जातात.
रेकीसाठी महिलांचा वापर – दिवसाढवळ्या स्वस्तात वस्तू विकण्याच्या बहाण्याने किंवा घर मागण्याच्या कारणाने महिलांना पुढे करून घरातील स्थितीची रेकी केली जाते.
—
आपली वैयक्तिक जबाबदारी
रात्री उशिरा अनोळखी आवाज, ड्रोनचा आवाज किंवा सावली दिसल्यास त्वरित जागे व्हा आणि सुरक्षित ठिकाणी राहा.
एकटे बाहेर न पडता शेजाऱ्यांनाही सावध करा.
घराच्या अंगणात आणि प्रवेशद्वाराजवळ मोशन सेन्सर लाईट्स आणि CCTV कॅमेरे लावा.
घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी व तिजोरीत ठेवा.
अनोळखी व्यक्ती किंवा विक्रेत्यांशी संवाद साधताना दार पूर्ण उघडू नका.
—
ग्रामस्थांची सामूहिक जबाबदारी
गावात रात्री गस्त घालण्यासाठी स्वयंसेवी पथक तयार करा.
गावाच्या प्रवेशद्वारावर व मुख्य रस्त्यांवर CCTV लावा.
व्हॉट्सअॅप गट, सायरन किंवा घंटा यंत्रणा तयार करून तात्काळ इशारा प्रणाली सुरु ठेवा.
अनोळखी वाहनं व व्यक्तींची नंबर प्लेट व फोटो नोंदवा.
गावात येणाऱ्या विक्रेत्यांची, भिकाऱ्यांची व पाहुण्यांची नोंद ठेवा.
—
“””” पोलिसांची जबाबदारी “””””
अशा घटनांवर तात्काळ प्रतिसाद व गस्त वाढवणे.
ड्रोनचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक पथक तयार करणे.
लोकांशी संवाद साधून गावनिहाय सुरक्षा मार्गदर्शन करणे.
चोरांच्या टोळीचा गुन्हेगारी इतिहास तपासून मोठ्या प्रमाणात कारवाई करणे.
रात्रीच्या वेळी पोलीस-पेट्रोलिंग वाहनं गावात व ग्रामीण भागात फिरवणे.
— ही माहिती प्रत्येक शेजारी, मित्र-परिवार आणि गावातील लोकांपर्यंत पोहोचवा.
एकत्रित प्रयत्न केल्यासच आपण या टोळीला थांबवू शकतो!
घडलेल्या सर्व घटना गावकऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे..



