नाशिक ग्रामीण

नाफेडचा कांदा अडवला, उद्या पासून ट्रक रस्त्यावर दिसले तर पेटवीले जाणार, शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटना यांचा इशारा

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ

सटाणा दि.१९सप्टेंबर २०२५:- नाफेडचे ट्रक उमराणे शिवारात ता.देवळा,  बरेच दिवसापासून नाफेड आणि एनसीसीएफ यांना आवाहन करतो आहोत की शेतकऱ्याचे बाजारातील कांद्याचे दर सहा ते सात रुपये पर्यंत कोसळले आहेत आणि त्याचा उत्पादन खर्च एक किलो कांद्याला सतरा ते वीस रुपये पर्यंत झालेले आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात आठ रुपये दराने कांदा विक्री होत आहे नाफेडच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची चर्चा करून नाफेडच्या कांदा देशांतर्गत विक्री करू नये त्यासाठी आम्ही विनंती करत आहोत आज रयत क्रांती शेतकरी संघटना व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून उमराणे शिवारात नाफेड चा लोड झालेला ट्रक जो लासलगाव येथे रॅक मध्ये लोड करण्या साठी घेऊन जात होते त्यांना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना थांबवले व त्या ड्रायव्हरला शाल श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला आणि उद्यापासून सर्व ट्रान्सपोर्ट मालक व ड्रायव्हर यांनी नाफेड चा कांदा लोड करू नये अशी विनंती करण्यात आली हा गांधी मार्गाने केलेले आंदोलन जर उद्या ट्रक लोड झाले तर गनिमी पद्धतीने क्रांती वीर भगतसिंग आम्हास व्हावे लागेल आणि जो ही ट्रक सापडला तर त्याला पेटवण्याची जबाबदारी माझे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते स्वतःच्या हिमतीवर करणार आहेत या आजच्या आंदोलनात रयत क्रांती शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे, स्व शरद जोशी शेतकरी संघटनेचे केशव सूर्यवंशी, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष मयूर नेरकर,रयत क्रांती शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल महाजन, देविदास अहिरे शेतकरी संघटना उपाध्यक्ष, शेतकरी संघटना कार्याध्यक्ष सटाणा तालुका भास्कर भाऊ बागुल इत्यादी मावळ्यांनी आजचा आंदोलन गांधीगिरी करून आणि शासनाला विनंतीस केलेले की उद्यापासून कोणतेही नाफेडचे ट्रक रस्त्यावर दिसल्यास आता ते आम्ही पेटवणारच

 

 

 

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!