दहिवड सोसायटीच्या प्रभारी चेअरमनपदी वसंत आहिरराव
तर व्हाईस चेअरमनपदी मंगलबाई सोनवणे यांची बिनविरोध निवड

मनोज वैद्य/दहिवड
9 ऑगस्ट 2025
देवळा तालुक्यातील प्रतिष्ठित दहिवड येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रभारी चेअरमनपदी वसंत श्रावण आहिरराव यांची तर व्हाईस चेअरमनपदी मंगलबाई गणपत सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी दिनांक 8 ऑगस्ट रोजी दहिवड येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कार्यालयात माजी चेअरमन दादाजी गमन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. सदर बैठकीत चेअरमनपदी वसंत आहिरराव व व्हाईस चेअरमनपदी मंगलबाई सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी संचालक दादाजी सोनवणे, हरिभाऊ बस्ते, बापू पवार, दिलीप सोनवणे, संभाजी सोनवणे, माणिक देवरे, वामन ठाकरे, श्रीमती सुनंदा पवार आदींसह माजी सरपंच मनिष ब्राह्मणकर, समाधान सोनवणे, विलास देवरे, संदीप पवार, दौलत सोनवणे, सजन सोनवणे, नारायण देवरे, गणपत सोनवणे, शिवमन सोनवणे, जिभाऊ पिंपळसे, दत्तू मिस्तरी आदी मान्यवर उपस्थित होते.