नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

माता एकविरा संपूर्ण पिठाधी देवी मंदिर,

Nandgaon News

माता एकविरा संपूर्ण पिठाधी देवी मंदिर, नांदगाव (जि. नाशिक)

वेगवान मराठी : मारुती जगधने 

[दि . 22 सप्टेंबर 2025 ]

नांदगाव शहरात भक्तांच्या श्रद्धेचं व आध्यात्मिकतेचं केंद्र असलेलं माता  एकविरा साडेतीन पिठा पैकी नांदगाव हे संपूर्ण पिठाधी देवीचं मंदिर भक्तांसाठी दिवसरात्र खुले राहतं. देवीची भव्य व सुंदर मूर्ती अनेक हातांत विविध अस्त्र शस्त्र धारण करून दुष्टांचा नाश व भक्तांचे कल्याण करण्याचा संदेश देत आहे. मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात.

नवरात्रोत्सव काळात येथे विशेष उत्साह दिसून येतो. देवीचा गाभारा फुलांनी व रोषणाईने सजवला जातो. या काळात आरती, भजन, कीर्तन आणि महाप्रसाद यांचा सोहळा भक्तांना आकर्षित करतो. स्थानिक लोकांसह दूरवरूनही भाविक दर्शनासाठी येथे गर्दी करतात.

मंदिर परिसर स्वच्छ, शांत व भक्तिमय वातावरणामुळे मनाला समाधान देणारा आहे. भक्तांमध्ये असा विश्वास आहे की, “माता एकविरा संपूर्ण पिठाधी देवीच्या दर्शनाने संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात.”

नांदगाव तालुक्यातील देवी  एकविरा माता मंदिर हे साडेतीन पिठांपैकी एक पूर्ण पीठ मानले जाते. या ठिकाणी विशेष म्हणजे देवीला कोणताही प्राण्याचा बळी अर्पण केला जात नाही. येथे फक्त सेव, रेवड्या, तसेच भाजी आणि भाकरीचा नैवेद्य देवीला दिला जातो.

नवरात्र काळात शेकडो महिला मंदिर परिसरात घटी बसतात. नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे परिसरात भक्तीभावाची आणि उत्साहाची लहर उसळते.

इतिहासानुसार, या पीठाची स्थापना प्राचीन काळी झाल्याचे मानले जाते. स्थानिक लोककथेनुसार, संकट काळात देवीने भक्तांचे रक्षण केले आणि गावावर मोठे संकट येण्यापासून वाचवले. त्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी भव्य सोहळा केला जातो.

देवी एकविरा माता हे नांदगावकरांसाठी श्रद्धास्थान असून, नवरात्रोत्सवाच्या काळात हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. या काळात मंदिर परिसरात व्यापारी, यात्रेकरू, महिला मंडळींची मोठी उपस्थिती दिसून येत .

छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळ आणि हिंदू पंच कमिटी यासाठी विशेष परिश्रम घेतात .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!