धनगर समाजाचे ‘ढोल बजाव आंदोलन’
वेगवान मराठी : मारुती जगधने
[दिनांक : २२ सप्टेंबर २०२५ ]
नांदगाव (ता. नांदगाव) │ आज दि. २२ सप्टेंबर रोजी नांदगाव तहसील कार्यालयासमोर सकल धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी ‘ढोल बजाव आंदोलन’ केले.
आंदोलनाची सुरुवात सकल धनगर समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळ्याचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनाद्वारे समाजाने अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाचा लाभ धनगर समाजाला मिळावा तसेच ‘धनगड’ हे चुकीचे नाव काढून ‘धनगर’ नाव दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली.
या वेळी धनगर समाजाचे नेते व माजी नगराध्यक्ष, शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे यांच्यासह माजी नगरअध्यक्ष शिवाजी पाटील, डॉ . गणेश चव्हाण, इंजि बीरू शिंदे, सुनील सोर, शरद आयनोर, सुनील मेघनार, भीका खटके, राम शिंदे, होनाजी आयनोर, राजू कवचाळे, चेतन शिंदे, संतोष सोर, मयुर सुळ, सुरज शिंदे, विक्की सुळ, ईश्वर कोळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून समाजाच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



