नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

इयत्ता १२ वी (HSC) बोर्ड परीक्षेची सुसूत्र आसनव्यवस्था; ६३७ विद्यार्थी सहभागी

Nandgaon news

इयत्ता १२ वी (HSC) बोर्ड परीक्षेची सुसूत्र आसनव्यवस्था; ६३७ विद्यार्थी सहभागी

वेगवान मराठी : मारुती जगधने

नांदगाव: दि . 8 फेब्रुवारी 2026

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव (परीक्षा केंद्र क्रमांक 0220) येथे इयत्ता १२ वी (HSC) बोर्ड परीक्षेच्या इंग्रजी विषयाचा पहिला पेपर मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी शांततापूर्ण वातावरणात पार पडणार आहे. या केंद्रावर एकूण ६३७ परीक्षार्थी परीक्षा देणार असून त्यांच्या आसनव्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
या परीक्षा केंद्रावर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव, जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भालूर तसेच कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साकोरे येथील विद्यार्थी सहभागी होत आहेत.
शाखानिहाय आसनव्यवस्था:
विज्ञान शाखा: S025079 ते S025377
कला शाखा: S106705 ते S106953
वाणिज्य शाखा: S159649 ते S159735
वोकेशनल कोर्स: S173124 ते S173127
ब्लॉक व इमारत रचना:
इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी एकूण २६ ब्लॉक तयार करण्यात आले आहेत.
वरचा मजला: ब्लॉक १ ते १४
खालचा मजला: ब्लॉक १५ ते २४
तळमजला (ग्राउंड फ्लोअर): ब्लॉक २५ व २६
सुरक्षा व प्रशासन:
परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी संपूर्ण कॅम्पसमध्ये CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. परीक्षा व्यवस्थापनासाठी प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक . आहेर पी. एम. व उपकेंद्र संचालक . राठोड डी. एम. यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत.
परीक्षार्थींनी वेळेत केंद्रावर उपस्थित राहून बोर्डाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!