नाशिक ग्रामीण

अनोखा उपक्रम ; जयंतीनिमित्त ६५ आंब्याच्या रोपांची  लागवड

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे’ या उक्तीप्रमाणे, देवळा तालुक्यातील भऊर येथील कै. रामदास (बापू) सीताराम पवार यांच्या ६५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी एक अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवला. त्यांचे बंधू सेवानिवृत्त आयुर्विमा अधिकारी जगन्नाथ पवार, सायली इंटरप्राईजेसचे संचालक कौतिक पवार आणि मुलगा प्रवीण पवार यांच्या वतीने भऊर येथील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ६५ उत्कृष्ट जातीच्या केशर आंब्याच्या रोपांची लागवड करण्यात आली.

हे वृक्षारोपण केवळ स्मृती जतन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न नसून, यामुळे गावातील शाळा परिसरात हिरवळ निर्माण होईल, पर्यावरणाचे शुद्धीकरण होईल आणि विद्यार्थ्यांना निसर्गाची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा कौतिक पवार यांनी व्यक्त केली. या प्रसंगी जगन्नाथ पवार यांनी सांगितले की, “बंधूंची आठवण सदैव राहावी या उदात्त हेतूने प्रत्येक शाळेला आम्रवृक्षाचे झाड भेट देऊन त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी शाळेकडे देण्यात आली आहे.

ग्रामपंचायत सदस्य दादा मोरे, भाऊसाहेब पवार, बी.आर.पवार, शिक्षक काशिनाथ सोनवणे, संजीव आहेर, विद्यार्थी, आदींसह पवार कुटुंबीयांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद भऊर पूर्व शाळेच्या आवारात ही रोपे लावून उपक्रमाची सुरवात करण्यात आली. गावातील सर्व सहा जिल्हा परिषद शाळा व श्री सिद्धेश्वर विद्यालय माध्यमिक शाळा अशा सर्वच ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते या रोपांची वाटप व लागवड करण्यात आली.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!