
- वेगवान मराठी : मारूती जगधने
॥ दि 18 ऑक्टोंबर 2025 ॥
वडाळी खुर्द (ता. नांदगाव) येथील प्रकाश सुरेश शिंदे या तरुणाला दहा दिवसांपूर्वी सर्पदंश झाल्यानंतर विवेक हॉस्पिटल, नांदगाव येथील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे नवजीवन लाभले. घराच्या अंगणात झोपलेला असताना कोब्रा जातीच्या सापाने त्याला दंश केला. तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्रकाश यांची प्रकृती गंभीर झाली होती.
डॉ. सुनील तुसे, डॉ. शशांक तुसे आणि त्यांच्या वैद्यकीय टीमने सलग प्रयत्न करून त्यांना वाचवले. प्रकाश तब्बल दहा दिवस व्हेंटिलेटरवर होता, मात्र योग्य उपचारांमुळे आता तो पूर्णपणे बरा होत आहे. प्रकाश हा नोकरभरतीसाठी तयारी करत असलेला तरुण असून या घटनेमुळे त्याला भरतीसाठी सहभागी होता आले नाही. प्रकाशच्या बहिणीने, जी स्वतः वैद्यकीय सेवेत आहे, भावासाठी अनेक रात्र जागून काढल्या. या घटनेनंतर डॉ. तुसे व त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विवेक, गोदावरी हॉस्पिटल, नांदगाव – प्रेस निवेदन
वडाळी खुर्द (ता. नांदगाव) येथील तरुण प्रकाश सुरेश शिंदे यांना कोब्रा सर्पदंश झाल्याने अत्यंत गंभीर अवस्थेत आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आमचे डॉ. सुनील तुसे, डॉ. शशांक तुसे आणि वैद्यकीय टीम यांनी तातडीने उपचार सुरू करून सलग प्रयत्नांनंतर रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून वाचवण्यात यश मिळवले.
रुग्ण दहा दिवस व्हेंटिलेटरवर होता. आवश्यक अँटीव्हेनम उपचार आणि काळजीपूर्वक देखरेख यामुळे त्यांची प्रकृती आता सुधारत आहे.
रुग्णाचा जीव वाचवण्यात आलेल्या यशाबद्दल विवेक हॉस्पिटल सर्व वैद्यकीय कर्मचारी व सहयोगी यांचे अभिनंदन करते. वेळेवर उपचार आणि सामूहिक प्रयत्नांमुळे एक तरुण जीव वाचवण्यात आला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.



