दिंडोरीः तो हातात रॅाड घेऊन पळत आला… आणि..

वेगवान नाशिक / सागर मोर
वणी – पाण्याच्या बाटलीचे पैसे मागीतल्याचा राग आल्याने दारुच्या नशेत असलेल्या गुंडाने लोखंडी पात्याच्या राॕडने फिर्यादी व साक्षिदार यांचेवर हल्ला करुन हाॕटेलच्या काचा फोडुन आर्थिक नुकसान करत हाॕटेल ठेवणार नाही अशी धमकी दिल्याच्या तक्रारीवरुन संशयीत विरोधात वणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हिरामन किसन सातपुते यांचे वणी कळवण रस्त्यावर हाॕटेल पारीजात ईन हे हाॕटेल आहे.मंगळवारी रात्री दहाचे सुमारास तीन ते चार लोक हाॕटेल बाहेर होते त्यात अतुल साहेबराव निगळ रा,ओझे तालुका दिंडोरी त्यांचेसमवेत होता.त्याने पिण्याच्या पाण्याची बाटली सातपुते यांचेकडे मागीतली त्याचे पैसे मागीतले असता निगळ याने वाद केला
तेव्हा उपस्थितानी तो सामोपचाराने मिटविला मात्र काही वेळाने निगळ हा MH 46 -BE – 1399 या क्रमांकाचे मारुती एक्स राॕक्स वाहन घेऊन आला व खाली उतरत असताना हातात लोखंडी पात्याचा राॕड घेऊन आला व जीवे मारण्याच्या हेतुने दारुच्या नशेत हिरामन सातपुते व साक्षिदार दिलीप पंढरीनाथ निकम यांचेवर सदर शस्त्राने वार करुन गंभीर दुखापत केली
हाॕटेलाच्या दर्शनी भागाच्या काचा फोडुन शिवीगाळ करत दहशत माजविली,वणी पोलिसांनाही माहीती देण्यात आली सदर संशयीत गुंडा विरोधात वणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असुन सदर संशयीता विरोधात कडककारावाई करावी अशी मागणी हाॕटेल्स व्यापारी असोशिएशन यांनी केली असुन वणी परीसरात यामुळे हाॕटेल्स व्यावसायिक धास्तावले आहेत,



