
मनमाड बाजार समितीचे सभापती गणेश धात्रक यांचा सत्कार
मनमाड : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश धात्रक यांचा शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कार प्रसंगी बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी बाजार समितीमार्फत शेतकरीहिताचे निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी धात्रक यांच्या कार्याला शुभेच्छा देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो कॅप्शन : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश धात्रक यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.



