विद्यार्थ्यांनी बनवल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती मानवी साखळीतून साकारला साक्षात श्री गणेशा
विद्यार्थ्यांनी बनवल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती मानवी साखळीतून साकारला साक्षात श्री गणेशा

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला: दिनांक :26ऑगस्ट
येवला तालुक्यातील अंदरसूल मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालयात गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता ५ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शाडू माती व साध्या मातीपासून आकर्षक गणेश मूर्ती घडवल्या आणि रंगविल्या. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मूर्तीत विविध फळझाडांच्या बिया ठेवण्यात आल्या असून विसर्जनानंतर या मूर्ती वृक्षसंवर्धक ठरणार आहेत.
मानवी साखळीतून श्रीगणेशाची प्रतिकृती
या उपक्रमाचा आणखी एक अनोखा भाग म्हणजे विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे साकारलेली श्रीगणेशाची प्रतिकृती. या दृश्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांचे कौतुक
या उपक्रमाचे कौतुक करताना संकुलाचे प्रशासकीय अधिकारी आर. बी. गायकवाड सर म्हणाले,
“विद्यार्थ्यांनी अभ्यास, खेळाबरोबरच आपले छंदही जोपासले पाहिजेत. अशा उपक्रमांमुळे त्यांच्यातील सृजनशीलता अधिक खुलते.”
उपस्थित मान्यवर
कार्यक्रम प्रसंगी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, शिक्षक-शिक्षिका सुषमा सोनवणे, कोमल जमदाडे, सुजाता भागवत, आरती भागवत, प्रतीक्षा साताळकर, माधुरी निकम, सोनाली पाटोळे, स्नेहल थोरात, अश्विनी मेहेत्रे, दिपाली सोनवणे, तसेच संतोष जाधव, महेश मेहेत्रे, सोहम मेहेत्रे, शिवप्रसाद शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.



