महाराष्ट्र,देश

महाराष्ट्रात पुढील ४८ तास अवकाळी पावसाचे सावट

वेगवान नेटवर्क /  साहेबराव ठाकरे, 

नाशिक, ता. 13 जानेवारी 2026 Maharashtra Weather Update -हवामानात सतत होणाऱ्या उलटसुलट बदलांचा फटका सर्वसामान्यांच्या आरोग्यावर स्पष्टपणे जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस तापमानातील चढउतार कायम राहणार आहेत. उत्तर भारतात कडाक्याची थंडी सुरूच असताना, राज्यातील तापमान मात्र वाढताना दिसत आहे. थंडीचा जोर काहीसा कमी झाला असला तरी वायू प्रदूषणाची पातळी अद्यापही उच्चच असून, त्यामुळे श्वसनासंबंधी त्रासांची संख्या वाढत आहे. डॉक्टरांनी शक्यतो मास्कशिवाय बाहेर पडू नये, असा सल्लाही दिला आहे. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस Rain update कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलायं .

जानेवारीचा दुसरा आठवडा सुरु असतानाही देशातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. हवामान खात्याने काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातही वर्षाच्या पहिल्याच दिवशी वादळासह जोरदार पावसाची नोंद झाली. त्यानंतर तापमानात सतत चढउतार दिसत असून, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भात थंडी टिकून राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुण्यात तापमानाने अगदी विचित्र वळण घेतले आहे. शहराच्या अवघ्या 10 किलोमीटरच्या परिसरात तब्बल 6 अंशांची तफावत नोंदवली गेली. वाढते शहरीकरण, सुरू असलेली विकासकामे, सिमेंटची वाढती पकड आणि काही भागात अद्याप शाबूत असलेली दाट हिरवाई—या साऱ्यांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असल्याचे स्पष्ट होते. गेल्या काही दिवसांत पुण्याच्या काही भागात किमान तापमान 9 ते 10 अंशांवर होते, तर इतर भागात ते 15 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदले गेले.

देशातील सर्वात कमी तापमान पंजाबमधील भटिंडामध्ये नोंदले गेले, ते फक्त 0.6 अंश सेल्सिअस होते. राज्यात धुळे येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली—6 अंश सेल्सिअस. निफाड येथे किमान तापमान 7.7 अंश तर भंडारा, गोंदिया आणि मालेगाव येथे 10 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदले गेले.

आजही राज्यात तापमानातील अस्थिरता कायम राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत आकाश ढगाळ राहणार असून, हलका ते मध्यम अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे हलक्यापासून जोरदार पावसापर्यंतची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!