नाशिक ग्रामीण

नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील पोलीस पाटीलांसाठी कार्यशाळेचे आयोजन

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.१९ ऑगस्ट २०२५ :- नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील पोलीस पाटीलांसाठी आज दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी महाकवी कालिदास कला मंदीर, नाशिक येथे पोलीस पाटील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
प्रमुख अतिथी म्हणुन नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे उपस्थित होते. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत करून कार्यक्रमास सुरूवात झाली.
यावेळी आयोजित कार्यशाळेत नवीन फौजदारी कायदेविषयक ज्ञान, पोलीस पाटलांचे कर्तव्य, अधिकार व मर्यादा, पोलीस पाटलांचा पुर्व इतिहास, पंचायत राज संस्थेचा महत्वाचा घटक, पोलीस पाटलांचे योगदान, पोलीस पाटील व पोलीस यांमधला दुवा, पोलीस पाटलांच्या कर्तव्याचा समाजावर होणारा चांगला परिणाम, कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीसांना होणारी मदत, पोलीस पाटलांनी ठेवावयाचे रजिष्टर, रजिष्टरमध्ये करावयाच्या महत्वाच्या नोंदी, गुन्हेगारी नियंत्रण, अवैध व्यवसाय समुळ उच्चाटन, तंटामुक्त गाव, सण-उत्सवादरम्यान राखावयाची शांतता व सुव्यवस्था, शांतता समिती सदस्य अशा अनेक मुद्यांवर पोलीस पाटलांच्या भुमिकेचे महत्व विषद करण्यात आले.
प्रमुख अतिथींनी उपस्थित पोलीस पाटलांना त्यांचे कर्तव्य व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. तसेच केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थ मुक्त गाव ही संकल्पना राबवुन, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत व धोक्यांविरुध्द लढण्यासाठी जनजागुंती निर्माण करावी यासाठी देखील यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख अतिथींच्या हस्ते पोलीस पाटील मार्गदर्शिका प्रसारित करण्यात आली. सदर मार्गदर्शिकेत नमुद केलेले पोलीस पाटलांचे कर्तव्य व अधिकार याप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी उपस्थितांना यावेळी पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
पोलीस पाटलांच्या कार्यामुळे प्रशासनाचे काम सुकर होत असून, भविष्यातही त्यांच्याकडून अशाच प्रकारे सहकार्य अपेक्षित असल्याचे यावेळी नमुद करण्यात आले. यावेळी सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांनी केले. सदर कार्यक्रमप्रसंगी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय नितीनकुमार गोकावे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रविंद्र मगर, पोलीस निरीक्षक मानव संसाधन विभाग राहुल मोरे, पो.हवा ज्ञानेश्वर शेलार, यांचेसह नाशिक विभागातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, जिल्ह्यातील गाव पातळीवरील सुमारे ७५० पोलीस पाटील, प्रसार माध्यामांचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!