या पंचायत समिती शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा शिक्षकांना अवमानकारक वर्तन
Nandgaon news
या पंचायत समिती शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा शिक्षकांना अवमानकारक वर्तन
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव, दि. ४ ऑक्टोबर २०२५
पंचायत समिती नांदगाव शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा अयोग्य आणि अवमानकारक अनुभव शिक्षकांना आला.
पदवीधर शिक्षक यादीसाठी अर्ज व कागदपत्रे सादर करण्यासाठी शिक्षक सकाळी १०.३० वाजता कार्यालयात गेले असता, कार्यालय कुलूपबंद होते. पंधरा मिनिटांनी दोन कर्मचारी आले व गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले उपस्थित झाले. शिक्षकांनी अर्ज तयार करून कागदपत्रे जोडून दिली, मात्र अर्ज स्वीकारण्यासाठी ताटकळत ठेवण्यात आले.
दिड तास प्रतीक्षा केल्यानंतर अर्ज घ्यावा अशी विनंती केल्यावर क्लर्क वाडेकर यांनी संतापाने अयोग्य शब्द वापरत शिक्षकांचा अपमान केला. एवढेच नव्हे तर, “मी हुकुमशहा आहे” असे वक्तव्य करत अर्ज घेण्यास नकार दिला. मोबाईल शुटींग सुरू होताच संबंधित कर्मचारी गप्प बसला. असे video चित्रण करणाऱ्या कर्मचाऱ्या चें सांगणे आहे .
सदर शिक्षकांच्या मते, जाणूनबुजून कामात विलंब, ताटकळ, आणि चिरीमिरीची अपेक्षा हा नेहमीचा पायंडा या कार्यालयात पडला आहे. या घटनेचा व्हिडिओ शिक्षक संघटनेच्या गटांमध्ये शेअर होताच अनेक शिक्षकांनी समान अनुभव असल्याचे सांगितले.?
शिक्षकांनी मागणी केली आहे की –
पंचायत समिती कार्यालयात किमान ५ CCTV कॅमेरे बसवावेत
अवमानकारक वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी
ही मागणी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया :-
[चिंचोले प्रमोद ग .शि. अधिकारी नांदगांव :- खरं तर सुट्टी असुन देखील वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनांनुसार कार्यालयीन कामकाज सुरु ठेवले होते. त्यामुळे कार्यालय उशिरा उघडले यात काही तथ्य नाही . शुक्रवारीच सर्वांना कागदपत्रे जमा करण्यास सांगितले होते . तथापी काही शिक्षकांचे कागदपत्रे जमा करणे बाकी होते . ते शनिवारी कार्यालयात आले होते . त्यावेळी संबंधित आस्थापना लिपिक सेवापुस्तक तपासून सदर माहिती तयार करत होते व जे आले होते त्यांना संबधित लिपिकाने थांबण्यास सांगितले होते .त्याप्रमाणे आलेले शिक्षक थांबले होते . प्रत्यक्ष हा प्रसंग घडला तेव्हा मी कार्यालयात नव्हतो त्यामुळे त्यांच्यात काय संवाद झाला हे मी सांगू शकत नाही . मात्र अन्य कोणत्याही शिक्षकाची तक्रार नाही . ]
वरील विषयास संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे .?



